विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलविल्यानंतर I.N.D.I.A आघाडीतले घटक पक्ष घायकुतीला आले आहेत. त्यामुळे ते देशाचे नाव बदलण्याची अफवा पसरवत आहेत, अशा शब्दांत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी विरोधकांची खिल्ली उडवली आहे, पण त्याच वेळी काँग्रेसच्या काँग्रेस संसदेच्या नेत्या सोनिया गांधी या पंतप्रधान नरेंद्र मोदींना विशेष अधिवेशनाचा अजेंडा जाहीर करण्याची मागणी करणारे पत्र लिहिणार आहेत. govt as oppn claims india to be renamed in special parliment session
इंडिया की भारत असा काल दिवसभर देशभरात वाद झाला. द प्रेसिडेंट ऑफ भारत आणि द प्राईम मिनिस्टर ऑफ भारत अशी नोंद सरकारी निमंत्रण पत्रिका आणि सरकारी परदेश दौऱ्यांमध्ये आढळल्यानंतर काँग्रेस सह विरोधकांनी त्यावर आक्षेप घेतला. अनेक काँग्रेस नेत्यांनी कल्पनांचे राजकीय कल्पनांचे अनेक पतंग उडवले. काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी मोदी सरकार भारतीय संघराज्य वर घाला घालत असल्याचा आरोप केला.
पण त्या संदर्भात पियुष गोयल यांनी स्पष्ट खुलासा करून विरोधकांची खिल्ली उडवली. विरोधकांना कोणते काम नसल्यामुळे ते देशाचे नाव बदलण्याच्या अफवा पसरवत आहेत, असा आरोप त्यांनी केला.
मात्र तरी देखील विरोधक घायकुतीला आल्याची वस्तुस्थिती मात्र लपत नाही. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी काल “इंडिया” आघाडीतल्या अनेक नेत्यांची बैठक झाली आणि त्यानंतर सोनिया गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहून संसदेच्या विशेष अधिवेशनाचा अजेंडा मागावा असे ठरविण्यात आले.
वास्तविक संसदेचे कुठलेही अधिवेशन अजेंड्याशिवाय होतच नाही. सरकार योग्यवेळी तो अजेंडा जाहीर करतच असते. त्यामुळे विशेष अधिवेशन सुरू होण्यापूर्वी मोदी सरकार त्याचा अजेंडा जाहीर करणारच आहे. त्यामुळे सोनिया गांधी यांनी लिहिणार असलेले पत्र हे सर्व विरोधक घायकुतीला आल्याचे निदर्शक ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App