मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती खूपच बिघडली आहे. Govinda seriously injured after being hit by a bullet
विशेष प्रतिनिधी
मुंबई : बॉलीवूड अभिनेता आणि शिवसेना नेते गोविंदा यांच्यावर आज पहाटे स्वतःच्या बंदुकीचीच गोळी लागल्याचे वृत्त आहे. अभिनेता गोविंदा बंदूक साफ करत असताना अचानक त्याच्या पायात गोळी लागली, त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. Govinda
ही घटना पहाटे 4.45 च्या सुमारास घडली, जेव्हा गोविंदा कुठेतरी जाण्यासाठी निघाला होता. त्याच क्षणी चुकून गोळी झाडली गेली. गोविंदाच्या पायाला गोळी लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती खूपच बिघडली आहे. सध्या गोविंदा अंधेरीच्या क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. Govinda
Bhagyshri Atram : पवारांच्या घरफोडीला काँग्रेसचाच खोडा; वडेट्टीवार म्हणाले, भाग्यश्री अत्राम करतील धर्मरावबाबांचा विजय सोपा!!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्याला गोळी लागल्याचे वृत्त समजतात पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी गोविंदाची बंदूक ताब्यात घेतली. पोलिसांचे म्हणणे आहे की गोविंदा सकाळी कुठेतरी बाहेर जात असताना त्याने त्याचे परवाना असलेले रिव्हॉल्व्हर तपासले, तेव्हा चुकून त्याच्या गुडघ्याजवळ गोळी झाडली गेली. सध्या त्यांच्या प्रकृतीबाबत कोणतीही अपडेट आलेली नाही. याबाबत गोविंदाचे कुटुंबीय लवकरच निवेदन जारी करणार आहेत.
अभिनेता गोविंदा लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील झाला होता. त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीतही त्यांनी जोरदार प्रचार केला होता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more