वृत्तसंस्था
नवी दिल्ली : अर्थ मंत्रालयाच्या फायनान्शियल इंटेलिजेंस युनिट (FIU) ने केंद्र सरकारला बिनान्स, बिटरेक्स, हुबी आणि MEXC ग्लोबल यासह 9 विदेशी क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज ब्लॉक करण्यास सांगितले आहे.
यासोबतच, FIU ने 9 ऑफशोर क्रिप्टोकरन्सी आणि Binance आणि KuCoin सारख्या व्हर्च्युअल डिजिटल मालमत्ता प्लॅटफॉर्मना मनी लाँडरिंग विरोधी कायद्याचे पालन न केल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. क्रिप्टोकरन्सी सतत चिंतेचे कारण राहिल्या आहेत, कारण त्या नियंत्रित नसतात.
अर्थ मंत्रालयाने काय म्हटले?
या प्रकरणावर वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट इंडिया (FIU IND) ने मनी लाँडरिंग प्रतिबंध कायदा, 2002 (PMLA) च्या कलम 13 अंतर्गत 9 ऑफशोर व्हर्च्युअल डिजिटल मालमत्ता सेवा प्रदाते (VDA SPs) यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
सरकारचे डिजिटल मालमत्तांवर बारीक लक्ष, क्रिप्टोकरन्सीवर लागू होणारी मनी लाँडरिंगच्या तरतुदी
मंत्रालयाने केंद्र सरकारला पीएमएल कायद्याच्या तरतुदींचे पालन न करता भारतात बेकायदेशीरपणे कार्यरत असलेल्या संस्थांचे URL ब्लॉक करण्यास सांगितले आहे.
पुढे काय?
अर्थ मंत्रालयाने क्रिप्टो कंपन्यांना पाठवलेल्या नोटीसमध्ये उत्तरासाठी कोणतीही तारीख निश्चित केलेली नाही. अशा परिस्थितीत क्रिप्टो कंपन्यांनी नोटीसला वेळेवर उत्तर न दिल्यास केंद्र सरकार त्यांच्यावर लवकरच कारवाई करू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला केंद्र सरकारने माहिती दिली होती की 28 देशांतर्गत क्रिप्टो सेवा प्रदाता कंपन्यांनी FIU मध्ये नोंदणी केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App