वृत्तसंस्था
नवी दिल्ली : Government देशातील रस्ते अपघात कमी करण्यासाठी आणि जबाबदार ड्रायव्हिंगला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार ग्रेड (गुण) आधारित ड्रायव्हिंग लायसन्स प्रणाली सुरू करण्याची योजना आखत आहे. यामध्ये वाहतूक नियम मोडल्यास लायसन्स रद्द किंवा निलंबित करण्याची तरतूद असेल.Government
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, दरवर्षी देशात सुमारे 1.8 लाख लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो. याची मुख्य कारणे आहेत – गाडी चालवताना मोबाईल फोनचा वापर, अति वेग, चुकीच्या दिशेने गाडी चालवणे आणि नशेत वाहन चालवणे.Government
ते म्हणाले की, लोकांचा जीव खूप मौल्यवान आहे आणि सरकार रस्ते सुरक्षेसाठी अनेक पावले उचलत आहे. वाहतूक नियमांच्या उल्लंघनावर दंड वाढवण्यात आला आहे, परंतु सर्वात मोठी समस्या नियमांचे योग्य पालन करणे ही आहे. लोकांमध्ये कायद्याची भीती आणि आदर कमी आहे.Government
दरवर्षी भारतात 5 लाख रस्ते अपघात
भारतात दरवर्षी 5 लाख रस्ते अपघात होतात. यामध्ये 1.8 लाख लोकांचा मृत्यू होतो. यापैकी 72% मृत्यू 18 ते 45 वयोगटातील लोकांचे असतात. 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या 10,119 लोकांचा मृत्यू झाला.
हेल्मेट न घातल्यामुळे 54,122 मृत्यू झाले.
सीट बेल्ट न लावल्यामुळे 14,466 लोकांचा मृत्यू झाला.
भरधाव वेगामुळे 1.2 लाख मृत्यू झाले.
इतर कारणांमध्ये चुकीच्या दिशेने वाहन चालवणे, दारू पिऊन गाडी चालवणे आणि मोबाईलचा वापर करणे यांचा समावेश आहे. मंत्र्यांनी लोकांना आवाहन केले की, रस्ते अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला मदत करावी आणि उपचाराचा खर्च किंवा कायदेशीर अडचणींची चिंता करू नये.
त्यांनी सांगितले की, PM राहत (Road Accident Victim Hospitalisation and Assured Treatment) योजनेअंतर्गत रस्ते अपघातातील पीडित व्यक्तीला 7 दिवसांपर्यंत 1.5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार (कॅशलेस) मिळतील.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App