वृत्तसंस्था
गोरखपूर : सुप्रसिद्ध गोरखपूर मंदिर परिसरात घुसून हल्ला करणारा मुर्तजा अहमद अब्बसी हा मुंबई आयआयटीच्या पदवीधर आहेच. पण त्याचे आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना ISIS बरोबर संबंध आहेत. त्याने या संघटनेला सिरियात 8.5 लाख रूपये पाठविले होते. तो सतत त्या संघटनेच्या म्होरक्यांच्या संपर्कात होता, असा धक्कादायक खुलासा उत्तर प्रदेश पोलिसांच्या एटीएसने केला असून त्याच्या सखोल तपासात हे मोठे दहशतवादी हल्ल्याचे कारस्थान असल्याचे उत्तर प्रदेश पोलिसांनी स्पष्ट केले आहे.Gorakhpur Temple Attack: Terrorist Murtaza Abbasi’s ISIS connection revealed
मुर्तजा अब्बासी आधी जाहीर केल्याप्रमाणे मानसिक रुग्ण वगैरे काही नसून तो अट्टल दहशतवादी आहे. तो सिरियातल्या दहशतवादी संघटनेशी सतत संपर्कात होता. त्याचा मोबाईल, लॅपटॉप, इ वॉलेट तसेच अन्य सामग्रीची सखोल तपासणी केल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. त्याने दहशतवादी संघटनांना मदतीसाठी इ वॉलेट मधून 8.5 रुपये पाठवले असल्याचे देखील उघड झाले आहे. बांगलादेशातील दहशतवाद्यांशी देखील तो नियमित संपर्कात असल्याचे तपासात आढळून आले आहे. उत्तर प्रदेश पोलीस महानिरीक्षक प्रशांत कुमार यांनी ही माहिती दिली आहे. मुर्तजा अब्बासी याला आता गोरखपूर जेलमधून लखनौला हलविले आहे. त्यानंतरच्या तपासातून अधिक तारा खुलण्याची पोलीसांना अपेक्षा आहे.
हल्लेखोर मुर्तजा अहमद अब्बासी याला धाडसाने पकडणार्या पोलिसांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रत्येकी पाच लाख रूपयांचे इनाम जाहीर केले आहे. हल्लेखोर मुर्तजा अहमद अब्बसी हा गोरखपूरच्या डॉ. अब्बासी या सुप्रसिद्ध परिवारातील मुलगा आहे.
रविवारी सायंकाळी अचानक गोरखपूर मंदिर परिसरात मुर्तजा अहमद अब्बासी हा जाऊन पोहोचला. त्याला सुरक्षा रक्षकांनी संशयावरून सुरुवातीला अडवायचा प्रयत्न केल्यानंतर त्याने आपल्या जवळचा कोयता बाहेर काढून पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. यामध्ये दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. परंतु, तिसऱ्या पोलिस कर्मचाऱ्याने धाडसाने त्याचा पाठलाग केला आणि अन्य पोलिस कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने त्याला पकडले. तोपर्यंत मंदिर परिसरात हल्लेखोरांचा धुमाकूळ चालला होता. काही मिनिटे हा धुमाकूळ चाललेला असताना अनेक बघे तेथे जमले होते. त्यामुळे गोंधळात भर पडत होती. मुर्तजा अहमद अब्बासी हा अल्ला हू अकबरच्या घोषणा देत पोलिसांना आपल्याला गोळी घालण्याचे आव्हान देत होता. परंतु पोलिसांनी त्याला शिताफीने पकडले.
मुर्तजा अहमद अब्बासीला पकडल्यानंतर प्राथमिक चौकशीत हा दहशतवादी हल्ला असल्याचे आढळून आले. मूर्तजा अब्बासीकडून कोयता तसेच त्याचा लॅपटॉप आणि अन्य काही साहित्य जप्त केले आहे. उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष टीमने तसेच दहशतवाद प्रतिबंधक टीमने तपास हाती घेतला असून त्याचे मुर्तजा अब्बासीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन देखील तपासण्यात आले. त्याचा पासपोर्ट जप्त करण्यात आला असून तो मुंबई आयआयटीचा रसायन शास्त्रातला पदवीधर असल्याची माहिती पुढे आली आहे.
– दहशतवादी हल्ल्याची धमकी
गोरखपूर मंदिर हे दहशतवादी हल्ल्याच्या अनेक वर्षे टार्गेटवर राहिले आहे. 5 फेब्रुवारी 2022 रोजी असाच गोरखपूर मंदिरावरील हल्ल्याचा धमकी देणारा ईमेल आला होता. त्याची तपासणी देखील पोलीस करत आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा काल दुपारनंतर गोरखपूर दौरा होता. त्यामुळे पोलीस अधिकच सजग होते. या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाल्याने पोलिसांचा दहशतवादी हल्ल्याचा संशय अधिक बळावला मुर्तजा अब्बासी आणि त्याच्याशी संबंध असणाऱ्या अनेकांची चौकशी सध्या सुरू आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App