वृत्तसंस्था
मुंबई – कोव्हिडविरुद्धच्या लढ्यात भारताला बळ मिळावे यासाठी `गुगल`तर्फे दुसऱ्या टप्प्यात आणखी १३५ कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. `गुगल`ची समाजसेवी शाखा `गुगलडॉटओआरजी`तर्फे तसेच त्यांच्या कर्मचाऱ्यांतर्फे मदत दिली जाणार आहे. त्यातील बहुतांश रक्कम भारतासाठी कोरोना लढ्यातील वैद्यकीय उपकरणे, औषधे आदींच्या खरेदीसाठी युनिसेफला दिली जाईल. Google gives 135 cr to India for covid war
कोरोनाच्या संसर्गामुळे भारतासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. रोजची कोरोना रुग्णसंख्या वाढत असून वैद्यकीय उपकरणांचीही टंचाई निर्माण होत असल्याने मदत देण्याचा निर्णय `गुगल`ने घेतला आहे. त्यातील २० कोटी रुपये थेट गरजू कुटुंबांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी दिले जातील. आतापर्यंत `गुगल`च्या कर्मचाऱ्यांनीही भारतासाठी पावणेचार कोटी रुपयांची मदत दिली आहे.
कोरोनाविरुद्धच्या लढ्यात नागरिकांना अचूक माहिती देण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनाही मदत देण्यात आली आहे. कोव्हिड चाचण्या व लसीकरण यांच्या केंद्रांची माहिती देण्यासाठीही यापैकी काही निधी वापरला जाईल. त्यासाठी `गुगल`तर्फे केंद्रीय आरोग्य मंत्रालय तसेच बिल-मेलिंडा गेट्स फाऊंडेशनबरोबरदेखील सहकार्य करण्यात आले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App