Edible oil Prices fall : खाद्यतेलांच्या किमती कमी झाल्या आहेत. केंद्राने सांगितले की, घरगुती पुरवठा वाढवण्यासाठी आणि साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने उचलेल्या सर्व पावलांनंतर देशभरातील घाऊक बाजारात आठ प्रकारच्या खाद्यतेलांच्या किमती गेल्या आठवड्याच्या तुलनेत घसरत चालल्या आहेत. 14 सप्टेंबरला संपलेल्या आठवड्यात शेंगदाणे, मोहरीचे तेल, वनस्पती, सूर्यफूल तेल, पाम तेल, नारळ तेल आणि तीळ तेलाच्या घाऊक किमती कमी झाल्या आहेत. सप्टेंबरमध्ये त्या 2.50 टक्क्यांनी घसरून 12,349 रुपये प्रति टनावर आल्या, आठवड्यापूर्वी हे दर 12,666 रुपये प्रति टन होते. Good News edible oil Prices fall know New cheap rates Of mustard and other oils read in Details
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : खाद्यतेलांच्या किमती कमी झाल्या आहेत. केंद्राने सांगितले की, घरगुती पुरवठा वाढवण्यासाठी आणि साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने उचलेल्या सर्व पावलांनंतर देशभरातील घाऊक बाजारात आठ प्रकारच्या खाद्यतेलांच्या किमती गेल्या आठवड्याच्या तुलनेत घसरत चालल्या आहेत. 14 सप्टेंबरला संपलेल्या आठवड्यात शेंगदाणे, मोहरीचे तेल, वनस्पती, सूर्यफूल तेल, पाम तेल, नारळ तेल आणि तीळ तेलाच्या घाऊक किमती कमी झाल्या आहेत. सप्टेंबरमध्ये त्या 2.50 टक्क्यांनी घसरून 12,349 रुपये प्रति टनावर आल्या, आठवड्यापूर्वी हे दर 12,666 रुपये प्रति टन होते.
तिळाच्या तेलाची घाऊक किंमत 2.08 टक्क्यांनी घसरून 23,500 रुपये प्रति टन झाली, तर खोबरेल तेल 1.72 टक्क्यांनी घटून 17,100 रुपये प्रति टन झाले. त्याचप्रमाणे, सूर्यफूल तेलाची घाऊक किंमत 14 सप्टेंबर रोजी 1.30 टक्क्यांनी घटून 15,965 रुपये प्रति टन झाली जी पूर्वी 16,176 रुपये होती.
या कालावधीत शेंगदाणा तेलाची घाऊक किंमत 1.38 टक्क्यांनी घटून 16,839 रुपये प्रति टन किंवा 1,684 रुपये प्रति क्विंटल झाली. त्याचबरोबर मोहरीचे तेल आणि वनस्पतीचे घाऊक भाव एक टक्क्याने कमी होऊन अनुक्रमे 16,573 रुपये आणि 12,508 रुपये प्रति टन झाले. खाद्यतेलांच्या घाऊक किमती कमी होत असल्याचे दिसून येत असले, तरी दर मात्र वर्षभरापूर्वीच्या याच कालावधीपेक्षा अधिक आहेत.
किंमती तपासण्यासाठी आणि देशांतर्गत पुरवठा वाढवण्यासाठी केंद्राने खाद्यतेलांवरील आयात शुल्क कमी केले आहे. तसेच साठेबाजीविरोधात पावले उचलली आहेत. घाऊक विक्रेते, मिल मालक आणि रिफायनर्सना त्यांच्या स्टॉकचा तपशील वेब पोर्टलवर टाकण्यास सांगितले आहे. अगदी किरकोळ विक्रेत्यांनाही ब्रँडेड खाद्यतेलांचे दर ठळकपणे दाखवण्यास सांगितले आहे, जेणेकरून ग्राहक त्यांच्या आवडीचे तेल निवडू शकतील.
अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग साप्ताहिक आधारावर देशातील खाद्यतेल/तेलबियांच्या साठ्यावर लक्ष ठेवण्यासाठी एक वेब पोर्टल विकसित करत आहे. मिल मालक, रिफायनर्स, स्टॉकिस्ट आणि घाऊक विक्रेते पोर्टलवर डेटा प्रविष्ट करतील.
भारत सरकारने कच्चे पाम तेल, कच्चे सोयाबीन तेल आणि कच्च्या सूर्यफूल तेलावरील शुल्काचे प्रमाणित दर आणखी 2.5 टक्के केले आहे. रिफाइंड पाम तेल, रिफाइंड सोयाबीन तेल आणि रिफाइंड सूर्यफूल तेलावरील शुल्काचा मानक दर 32.5 टक्के करण्यात आला आहे. या कपातीमुळे खाद्यतेलांच्या दैनंदिन घाऊक किमतीत घसरण झाली आहे.
Good News edible oil Prices fall know New cheap rates Of mustard and other oils read in Details
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App