वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारताची वाटचाल हॉकीच्या पुन्हा सुवर्णकाळाकडे चालली आहे. चीन मधल्या होंगजूमध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत भारताने पुरुष हॉकीच्या अंतिम सामन्यात जपानचा 5 – 1 असा पराभव करत सुवर्णपदक जिंकले आणि पॅरिस ऑलिंपिकचे तिकीट पक्के केले. भारत वेगाने 100 पदकांच्या दिशेने वाटचाल करतो आहे. भारताने या आशियाई स्पर्धेत 91 पदके आधीच जिंकली आहेत. या आशियाई स्पर्धेत हॉकीमध्ये भारताने एकही सामना गमावलेला नाही.Golden Age Again for Indian Hockey; Gold Medal in Asian Games Ticket to Paris Olympics!!
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने जबरदस्त कामगिरीचं प्रदर्शन केलं आहे. गेल्या 72 वर्षातील पदकांचा विक्रम मोडीत काढला आहे. भारताची मेडल संख्या 90 च्या पार गेली आहे. त्यात आणखी एका गोल्ड मेडलची भर पडली आहे. भारताने पहिल्या सत्रापासूनच जापानवर आघाडी मिळवली होती.विशेष म्हणजे भारतीय हॉकी संघ या एशियन गेम्समध्ये एकही सामना हारलेला नाही. बांगलादेश ते पाकिस्तान या सारख्या दिग्गज संघांना मोठ्या फरकाने पराभूत केलं.
भारताकडून पहिला गोल मनप्रीत सिंह याने मारला. पण जपानने रिव्ह्यू घेतल्याने निर्णय तिसऱ्या पंचांकडे गेला. पण तिसऱ्या पंचांनी गोल असल्याचं सांगितलं आणि टीम इंडियाने पहिली आघाडी मिळवली. त्यानंतर टीम इंडियाने मागे वळून पाहिलंच नाही. दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या सत्रातही आघाडी कायम ठेवली. या कामगिरीसह टीम इंडियाने सुवर्ण पदक मिळवलं आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App