विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशात आणि जगभरात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन आल्यामुळे गुंतवणूकदार ठोस गुंतवणुकीकडे वळत आहे. त्यामुळे सोन्याचे दर वाढण्यास पोषक वातावरण निर्माण होऊन सोने एखाद वर्षात ५५ हजार रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत पोहोचू शकते असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. Gold rates will increase in future
ऑगस्ट २०२० मध्ये जेव्हा कोरोनाची पहिली लाट आली होती, तेव्हा सोने ५६ हजार २०० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले होते. कोरोना प्रादुर्भावामुळे गुंतवणूकदारांमध्ये तोटा होण्याची भीती होती. लस आल्यानंतर सोन्याच्या दरात घसरणीचे सत्र सुरूच होते. त्यामुळे सोने ४४ हजार रुपयांपर्यंत घसरले होते; परंतु नव्या कोरोना व्हेरिएंटमुळे पुन्हा गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
दरम्यान गुंतवणूकदारांमध्ये गोल्ड ईटीएफची पसंती वाढत आहे. परिणामत: नोव्हेंबर महिन्यात गोल्ड ईटीएफमध्ये ६८३ कोटी रुपये गुंतवणूक आली. जी ऑक्टोबरच्या तुलनेत दुप्पटीहून अधिक होती. ऑक्टोबरमध्ये यात ३०४ कोटी रुपये गुंतवणूक झाली होती; तर सप्टेंबरमध्ये ४४६ कोटी रुपयांची ईटीएफमध्ये गुंतवणूक झाली.
असोसिएशन ऑफ म्युचुअल फंड्स इन इंडियाच्या (अम्फी) आकडेवारीतून ही माहिती समोर आली. गुंतवणूकदारांच्या मते, सध्याच्या काळ सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी योग्य आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more