विशेष प्रतिनिधी
लखनऊ : उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने झाशीच्या राणीचा गौरव केला आहे. झाशी रेल्वे स्टेशनचे वीरांगना लक्ष्मीबाई रेलवे स्टेशन असे नामकरण करण्यात आले आहे.Glory of Queen of Jhashi, Naming of Jhashi Railway Station Veerangana Lakshmibai Railway Station
केंद्र सरकारनेही झाशी रेल्वे स्टेशनचे नाव बदलण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे तांत्रिक बाकींची पूर्तता करण्यात आल्यावर नामकरणाची अधिसूचना जारी करण्यात आली. उत्तर प्रदेशातील राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारकडे झाशी रेल्वे स्टेशनचे वीरांगना लक्ष्मीबाई असे नामकरण करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला होता.
त्याला केंद्र सरकारने मंजुरी दिली. यापूर्वी योगी आदित्यनाथ सरकारने मुगलसराय रेल्वे स्टेशनचे नाव बदलून पंडित दीनदयाळ उपाध्याय असे ठेवण्यात आले होते. त्याचबरोबर इलाहाबाद शहराचे नाव प्रयागराज असे बदलण्यात आले आहे. फैजाबादचेही नाव अयोध्येचा असे केले गेले आहे.
झाशीची राणी म्हणून ओळखल्या जाणाºया राणी लक्ष्मीबाई या १८५७ च्या राष्ट्रीय उठावातील अग्रणी सेनानी होत्या. मेरी झॉँशी नहीं दूॅँगी असे म्हणत त्यांनी इंग्रंजांविरुध्द युध्द पुकारले होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App