वृत्तसंस्था
अयोध्या : ‘ अयोध्या मनू निर्मित नगरी,’ अशी ओळख असलेल्या अयोध्येच्या विकासाचा ध्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. लोकसहभागातून आणि तरुणाईने पुढाकारातून विकास व्हावा. तसेच शहराच्या विकासात प्राचीन आणि आधुनिकतेची झलक दिसावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. Glimpses of ancient, modernity Should seen in the development of Ayodhya : PM Modi’s appeal in the meeting
अयोध्या विकास आराखड्याची बैठक शनिवारी झाली. त्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. या बैठकीला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा आणि विविध मंत्री उपस्थित होते.
मोदी यांनी विकास आरखड्याचा आढावा घेतला. मोदी म्हणाले, जीवनात एकदा तरी अयोध्येला, राम मंदिराला भेट द्यावी, अशी भावना जनतेत निर्माण व्हावी, असे शहर साकारले पाहिजे. स्मार्ट सिटीबरोबरच अध्यात्मिक केंद्र आणि जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ बनविण्याचे ध्येय आहे.
अयोध्येने आपल्या उत्कृष्ट परंपरा जपल्या पाहिजेत तसेच त्याचे प्रकटी कारण विकासात दिसले पाहिजे. प्रत्येकासाठी फायदेशीर ठरणार्या भविष्यातील पायाभूत सुविधांमध्ये अयोध्याच्या मानवी नीतिमत्तेशी त्याची सांगड घालणे आवश्यक आहे. अयोध्येला प्रगतीपथावर नेण्यासाठी दिशा देण्याची गरज आहे. विकासकामांना निष्काम लोकसहभागाच्या भावनेने विशेषत: तरुणांनी मार्गदर्शन करावे, असे आवाहन मोदी यांनी केले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्याच्या विकास आराखड्याचा आढावा घेतला. उत्तर प्रदेश सरकारच्या अधिकाऱ्यांनी त्याचे सादरीकरण केले. त्यामध्ये अयोध्याच्या विकासाच्या विविध बाबींचा समावेश होता. मोदी यांना पायाभूत प्रकल्पाची माहिती देण्यात आली. त्यामध्ये विमानतळ, रेल्वे, बस स्थानक, महामार्ग यांचा समावेश होता.
आगामी ग्रीनफिल्ड टाउनशिपबाबत चर्चा करण्यात आली. ज्यामध्ये भाविकांसाठी राहण्याची सोय, आश्रम, मठ, हॉटेल, विविध राज्यांतील भवनांसाठी जागा या गोष्टींचा समावेश आहे. पर्यटन सुविधा केंद्र, जागतिक दर्जाचे संग्रहालयही बांधले जाईल.
शरयू नदी व घाटांच्या आसपास पायाभूत सुविधांच्या विकासाकडे विशेष लक्ष दिले जात आहे. शरयूत जलपर्यटनला प्राधान्य दिले जाईल. सायकल चालक आणि पादचारी यांना पुरेशी मोकळी जागा मिळावी यासाठी शहर विकसित केले जाईल. स्मार्ट सिटी इन्फ्रास्ट्रक्चरचा वापर करून वाहतूक व्यवस्थाही आधुनिक पद्धतीने केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यानी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App