भारत दौऱ्यावर आलेले रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास भेट दिली आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना खूप सुंदर आणि खास वस्तु भेट म्हणून दिली आहे. गुजरातच्या आदिवासी समुदायातील हस्तनिर्मित बाऊल्स त्यांनी भेट दिले आहेत.गुजरातच्या खंभाट भागातील कारागिरांची ही विशेष कला आहे.अॅगेट स्टोनमध्ये अतिशय बारीक नक्षीकाम करून बनवलेल्या या सुंदर बाउल्सची भेट पाहून पुतिनही जाम खुश झाले. Gift from Gujarat: PM Narendra Modi gives exquisite Agate Bowls to Russian President Vladimir Putin
गिफ्टमध्ये दिलेले बाऊल्स एका दगडापासून बनवलेले आहेत आणि त्यात कोणताही जोड नाही. “अॅगेट हे मौल्यवान दगड आहेत जे तेजोमय असतात. हे दगड भिल्लांच्या व्यापारी गटांनी डोंगर आणि नदीच्या खाणीतून काढले आहेत. खंबाट प्रदेशातील कारागीर हे गुजरात राज्य विविध प्रकारचे स्पेलबाइंडिंग दागिने, उपयुक्त उत्पादने आणि सजावट वस्तूंचे उत्पादन करतात. असेच एक उत्पादन म्हणजे Agate Bowls. कोणत्याही जोडणीशिवाय एकाच दगडापासून बनवलेले आहेत ज्यात विलक्षण कारागिरी आणि परिश्रम यांचा समावेश आहे. अॅगेट दगडांचे सिंधू संस्कृतीत देखील (3300-1300 BCE) पासून मण्यांच्या दागिन्यांच्या रूपात त्याचे महत्त्व सांगितले आहे.
MODI-PUTIN MEET : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन आज भारतात ! होणार एके-२०३ रायफल्स-डिफेन्स सिस्टीमचा सौदा ; ०६ महिन्यात पुतीन यांचा पहिला दौरा
दोन बलाढ्य नेत्यांच्या भेटीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. भेटीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना खंभाट आदिवासींनी बनवलेला बाऊल भेट म्हणून दिला. अॅगेट स्टोनमध्ये अतिशय बारीक नक्षीकाम करून बनवलेल्या या सुंदर बाउल्सची भेट पाहून पुतिनही खूश झाले हे लक्षात घेण्यासारखे आहे. या बाऊल्सला जगभरात मोठी मागणी आहे. अॅगेट ज्वेलरी आणि अॅगेट उत्पादनांना जगभरात जास्त मागणी आहे. या बाऊलचे वैशिष्ठ्य म्हणजे यात एकही जोड नाही. हे बाऊल्स दगडावर कोरून बनवले आहेत. बाऊल्स बनवणारा मोठा दगड शोधणे फार कठीण आहे. सापडल्यास त्यातून बाऊल्स बनवणे अवघड आहे. हा दगड अतिशय नाजूक असल्यामुळे त्याची वाटी बनवताना खूप काळजी आणि अचूकता लागते.
सोमवारी नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारत-रशिया शिखर परिषद आयोजित केली होती, ज्यामध्ये दोन्ही देशांमधील विशेष धोरणात्मक भागीदारी आणखी वाढवण्याच्या उद्देशाने अनेक क्षेत्रांचा समावेश होता. आपल्या सुरुवातीच्या भाषणात मोदी म्हणाले की, कोविड-19 महामारी असूनही भारत आणि रशियामधील संबंधांच्या गतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. दोन्ही देशांमधील विशेष धोरणात्मक संबंध अधिक दृढ होत असून अफगाणिस्तानातील परिस्थिती आणि इतर मुद्द्यांवर दोन्ही पक्ष संपर्कात असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App