पुणे : सध्या बॉलीवूड विश्वात गदर 2आणि ओएमजी 2 या दोन्ही सिनेमाची जोरदार चर्चा आहे.त्याचं बरोबर आता गेल्या आठवड्यात घूमर प्रदर्शित झाल्यानंतर त्याच्याविषयी सोशल मीडियातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येतं आहेत.बाल्की यांच्या घूमरनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या सिनेमाची सर्वत्र चर्चा असून, सयामीच्या अभिनयाचा विशेष कौतुक होताना दिसत आहे. Ghoomar movie master blaster Sachin Tendulkar appreciate the role of sayami!
घूमरमध्ये प्रसिद्ध अभिनेता अभिषेक बच्चन आणि सयामी खेर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या सिनेमांमध्ये संयमी खरे एका हात गमावलेल्या महिला क्रिकेटर ची भूमिका साकारत आहे. तर अभिषेक बच्चन हे एका कोचची भूमिका साकारत आहेत. या भूमिकेच आणि संयमीच्या अभिनयाचं विशेष कौतुक होत आहे.
View this post on Instagram A post shared by Saiyami Kher (@saiyami)
A post shared by Saiyami Kher (@saiyami)
तिच्या भूमिकेचं आता क्रिकेटच्या देवानं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरनं कौतुक केलं आहे.सचिन सयामीचं कौतुक करतानाचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर नेटकऱ्यांनी सयामीला दिलेल्या प्रतिक्रिया खूप काही सांगून जाणाऱ्या आहेत. सयामीच्या यापूर्वीच्या चित्रपटांमधील भूमिकांना प्रेक्षकांनी पसंत केले होते. आता सध्या तिच्या घूमर मधील अभिनयानं प्रेक्षकांना जिंकून घेतले आहे.
सचिननं घूमरमध्ये सयामीनं ज्या महिला फिरकीपटूची भूमिका साकारली आहे त्या भूमिकेची प्रशंसा केली आहे. १८ ऑगस्ट रोजी बाल्की दिग्दर्शित घूमर हा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.आर बाल्की यांच्या घूमर चित्रपटानं चाहत्यांची, समीक्षकांची वाहवा मिळवली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App