गौतम अदानी श्रीमंतीत अंबानींच्या जवळ, जगातील चौदावे श्रीमंत उद्योगपती


विशेष प्रतिनिधी

मुंबई : अदानी उद्योग समुहाचे गौतम अदानी हे जगातील चौदावे श्रीमंत उद्योगपती बनले आहेत. अदानी समूहाच्या कंपन्यांचे मार्केट कॅप वर्षभराच्या उच्चांकावर पोहोचले आहे. समूहाच्या एकूण 6 सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 9.91 लाख कोटी रुपये झाले आहे. श्रीमंतीत रिलायन्स इंडस्ट्रीच्या मुकेश अंबानी यांच्या अगदी जवळ गौतम अदानी पोहोचले आहेत.Gautam Adani is the 14th richest businessman in the world, close to Ambani

अदानी यांनी डेल कॉम्प्युटर्सचे मायकल डेल, ब्लूमबर्गचे मायकेल ब्लूमबर्ग, टिकटॉकचे झांग यिमिंग, नायकेचे फिल नाइट, वॉलमार्टचे तीन अधिकारी एलिस वॉल्टन, रॉब वॉल्टन, जिम वॉल्टन, बेव्हरेजेस फामार्चे झोंग. शानशान आणि टेलिकॉमचे कार्लोस स्लिम यांना मागे टाकले आहे.गेल्या 3 महिन्यांपासून अदानी समूहाच्या सर्व कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती झपाट्याने वाढल्या आहेत. या कंपन्यांमध्ये परदेशी गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीची बातमी 14 जून रोजी आली होती. त्यात म्हटले आहे की परदेशी गुंतवणूकदारांची माहिती नाही आणि अदानी शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या सर्व विदेशी कंपन्या एकाच पत्त्यावर नोंदणीकृत आहेत. यानंतर या समूहाच्या सर्व समभागांच्या किमती प्रचंड घसरल्या होत्या. या घसरणीमुळे 3 जुलै रोजी समूहाची एकूण मार्केट कॅप 7.08 लाख कोटी रुपयांवर गेली होते. तथापि, 11 जून रोजी या कंपन्यांचे मार्केट कॅप 9.42 लाख कोटी रुपये होते. आता हा आकडा 9.91 लाख कोटी रुपये आहे. म्हणजेच जुलैच्या तुलनेत 2.83 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे जुलैमध्ये जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींच्या क्रमवारीत गौतम अदानी 24 व्या क्रमांकावर घसरले. जुलैपासून या कंपन्यांचे शेअर्स पुन्हा सावरण्यास सुरुवात झाली. 14 जून ते 30 जून दरम्यान या कंपन्यांचे शेअर्स 50% पर्यंत घसरले होते.

12 नोव्हेंबरच्या बाजारावर नजर टाकली तर, अदानी टोटल गॅसचा शेअर 1,715 रुपयांच्या एका वषार्तील उच्चांकावर पोहोचला आहे. त्याची मार्केट कॅप 185,118 कोटी रुपये आहे. 3 जुलै रोजी ते 101,226 कोटी रुपये होते. यामध्ये 83,892 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. अदानी एंटरप्रायझेसचा शेअरही वर्षभराच्या सर्वोच्च पातळीवर आहे. त्याचे मार्केट कॅप 1.56 लाख कोटी रुपयांवरून 1.90 लाख कोटी रुपये झाले आहे. यामध्ये 34 हजार कोटींची वाढ झाली आहे. अदानी पोर्टचा शेअर 750 रुपयांवर आहे. त्याची मार्केट कॅप 1.53 लाख कोटी रुपयांवर गेली आहे. यामध्ये आठ हजार कोटींची वाढ झाली आहे.

अदानी पॉवरचा शेअर 109 रुपयांवर आहे. त्याची मार्केट कॅप 43 हजार कोटी आहे. अदानी ट्रान्समिशनचा शेअर एका वर्षाच्या टॉपवर रु. 1,995 वर व्यवहार करत आहे. त्याचे मार्केट कॅप 1.05 लाख कोटी रुपयांवरून 2.19 लाख कोटी रुपये झाले आहे. यामध्ये 1.13 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. अदानी ग्रीन एनजीर्चा शेअर रु. 1,286 वर व्यवहार करत आहे. त्याचे मार्केट कॅप 1.57 लाख कोटी रुपयांवरून 2 लाख कोटी रुपये झाले आहे. यामध्ये 43 हजार कोटींची वाढ झाली आहे. समूह कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती वाढल्याने अदानी यांच्या वैयक्तिक संपत्तीतही वाढ झाली आहे. फोर्ब्सच्या मते, त्यांची एकूण संपत्ती 81.2 अब्ज डॉलर आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी श्रीमंतांच्या यादीत 11 व्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 98.8 अब्ज डॉलर आहे. शेअर्सच्या किमती घसरल्याने अदानी यांची एकूण संपत्ती जुलैमध्ये 63.5 अब्ज डॉलरवर आली होती. तेव्हापासून त्यांची एकूण संपत्ती सुमारे 20 अब्ज डॉलरने वाढली आहे.

Gautam Adani is the 14th richest businessman in the world, close to Ambani

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात