गौरव वल्लभ काँग्रेसवर बरसले, राम मंदिरापासून अदानी-अंबानींपर्यंतच्या मुद्द्यांवरून सुनावले

Gaurav Vallabh showered Congress on issues ranging from Ram temple to Adani Ambani

काही दिवसांपूर्वीच गौरव वल्लभ यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये केला आहे प्रवेश Gaurav Vallabh showered Congress on issues ranging from Ram temple to Adani Ambani

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : अलीकडेच काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झालेल्या गौरव वल्लभ यांनी पुन्हा एकदा काँग्रेस हायकमांडवर हल्लाबोल केला आहे. रविवारी वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना गौरव वल्लभ म्हणाले की, मी काँग्रेसच्या सर्व वरिष्ठ नेत्यांना सांगितले की, देशातील संपत्ती निर्माण करणाऱ्यांवर टीका करणे थांबवावे लागेल, पण माझे कोणीही ऐकले नाही.

गौरव वल्लभ म्हणाले की, काँग्रेस सकाळपासून संध्याकाळपर्यंत अदानी आणि अंबानींवर टीका करत असते. मी काँग्रेसमध्ये असताना अदानींच्या संदर्भात पत्रकार परिषदही घेतली होती, पण जेव्हा सेबीने अदानींना क्लीन चिट दिली तेव्हा मी त्यांच्याबद्दल वक्तव्ये करणे बंद केले. मी काँग्रेस नेत्यांनाही असेच करायला सांगितले. मी त्यांना सांगितले की, आता सेबीने अदानीला क्लीन चिट दिली आहे, तेव्हा आपण त्यांच्यावर टीका करणे थांबवले पाहिजे.



काँग्रेस सनातन आणि राम मंदिरावर टीका करत राहिली. अदानी आणि अंबानींना विरोध केला. काँग्रेसने मला अर्थसंकल्पावर पत्रकार परिषद घेण्यास सांगितले तेव्हा मी त्यांना स्पष्टपणे सांगितले की, काँग्रेस नेते राम मंदिराला भेट दिल्याशिवाय मी तसे करणार नाही.

या संवादात गौराल वल्लभ उद्योगपतींचा बचाव करताना दिसले. ते म्हणाले की, संपत्ती निर्माण करणारे कोणतेही पाप करत नाहीत. त्याने आपल्या मेहनतीने एखादा व्यवसाय उभा केला तर त्याचा देशालाही फायदा होतो. लोकांना रोजगार मिळतो. जेव्हा एका कंपनीने एअर इंडिया विकत घेतली तेव्हा काँग्रेसनेही विरोध केला. देशातील शेकडो स्टार्टअप्स आज युनिकॉर्न बनले आहेत. आपणही त्यांना शिव्या देत राहायचे का? असा सवालही त्यांनी केला.

काँग्रेसच्या तिकिटावर दोन निवडणुका लढवलेल्या आणि पक्षाचे प्रवक्ते असलेले गौरव वल्लभ यांनी गुरुवारी (४ एप्रिल २०२४) काँग्रेसचा राजीनामा दिला आणि भारतीय जनता पक्षाचे सदस्यत्व घेतले. राजीनामा देताना त्यांनी म्हटले होते की, काँग्रेस पक्षात मला आराम वाटत नाही. ते म्हणाले होते की, ते सनातनविरोधी घोषणा देऊ शकत नाहीत आणि काँग्रेस पक्षात नव्या विचारांना जागा नाही.

Gaurav Vallabh showered Congress on issues ranging from Ram temple to Adani Ambani

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात