आत्मनिर्भर भारताची प्रेरणा लोकमान्यांच्या स्वराज्य – स्वदेशी आंदोलनात; टिळक पुरस्कार समारंभात पंतप्रधान मोदींचे गौरव उद्गार


प्रतिनिधी

पुणे :  देश इंग्रजांच्या गुलामगिरीत असताना लोकमान्य टिळकांनी संपूर्ण देशभरात स्वदेशी आत्मविश्वासाची प्रेरणा भरली. त्याच प्रेरणेतून आजच्या आत्मनिर्भर भारताची निर्मिती होत आहे, असे गौरव उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. पंतप्रधान मोदींना लोकमान्य टिळक सन्मान पुरस्कार पुण्यातल्या भव्य समारंभात प्रदान करण्यात आला, त्यावेळी मोदींनी आपल्या मनातल्या भावना व्यक्त केल्या.Prime Minister Modi’s eulogy at the Tilak Award ceremony

लोकमान्य टिळकांच्या योगदानाविषयी बोलताना मोदी म्हणाले, की लोकमान्य टिळक हे असे देशातले एकमेव नेता होते ज्यांनी इंग्रजांनी या देशाला गुलाम करण्यात वापरलेल्या सर्व धारणा खोडून काढल्या. या देशावर राज्य करायला भारतीय लायक नाहीत, अशी धारणा इंग्रजांनी तयार केली होती. ती लोकमान्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने मोडून काढली आणि देशातल्या सर्वसामान्य जनतेमध्ये आत्मविश्वास भरला. लोकमान्य यांची चतु:सूत्री हे त्याचेच प्रतीक आहे. या चतु:सूत्रीच्या आधारे आज आत्मनिर्भर भारत आगेकूच करत आहे, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.मोदींच्या या भाषणाला पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी मोदींनी लोकमान्य प्रेरणा महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनात कशी मोलाची ठरली, याची उदाहरणे दिली. स्वातंत्र्यवीर सावरकरांमधील खरी क्षमता लोकमान्यांनी ओळखली. सावरकरांनी इंग्लंडमध्ये जाऊन बॅरिस्टर होऊन यावे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घ्यावा यासाठी लोकमान्य शिफारस पत्र देऊन सावरकरांना छत्रपती शिवाजी शिष्यवृत्ती मिळवून दिली. सावरकरांनी त्यानंतर भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अमूल्य योगदान दिले. सरदार वल्लभभाई पटेल लोकमान्यांच्या भाषणातून एवढे प्रेरित झाले की त्यांनी अहमदाबाद नगरपालिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर व्हिक्टोरिया पार्कमध्ये लोकमान्य यांचा पूर्णाकृती पुतळा उभा केला. त्या पुतळ्याला विरोध झाल्यावर आपण अध्यक्षपद सोडू पण लोकमान्य यांचा पुतळा उभारूनच दाखवू, अशी प्रतिज्ञा सरदार वल्लभभाईंनी केली होती, याची आठवण मोदींनी सांगितली. महात्मा गांधींनी लोकमान्यांचे वर्णन आधुनिक भारताचा निर्माता असे केले होते, याची आठवण मोदींनी करून दिली

लोकमान्य टिळक यांची आज 103 वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त प्रतिष्ठित, समाजासाठी अतुलनीय कार्य करणाऱ्या लोकांचा लोकमान्य टिळक पुरस्कार सन्मान करण्यात येतो. यंदाचा लोकमान्य टिळक पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला. पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर हा कार्यक्रम झाला. पडला. या कार्यक्रमाला हजारो पुणेकर मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष दीपक टिळक यांच्या हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या पुरस्कार सोहळ्यासाठी लोकमान्य टिळक वापरायचे तसंच खास उपरणं मोदी यांना देण्यात आलं. लोकमान्य टिळक यांच्या ओळख असलेली पुणेरी पगडी यावेळी पंतप्रधानांना घालण्यात आली. पुरस्काराचं सन्मानपत्र, ट्रॉफी देण्यात आली. या ट्रॉफीत भगवत गीता, लोकमान्यांची पगडी, केसरी वृत्तपत्राचा पहिला अंक आणि लोकमान्यांची प्रतिमा आहे.

लोकमान्य टिळक पुरस्कारात एक लाख रूपयांची रक्कम दिली जाते. ही रक्कम पंतप्रधानांच्या सुचनेप्रमाणे नमामी गंगे प्रकल्पासाठी देण्यात आली आहे.

मोदींना पुरस्कार का दिला?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार का दिला जातोय, यावर टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष दीपक टिळक यांनी मोदींना पुरस्कार देण्यामागची भूमिका सांगितली.

दीपक टिळक म्हणाले…

भारताच्या प्रगतीत अतुलनीय योगदान देणाऱ्या व्यक्तीला दरवर्षी हा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतो. हा पुरस्कार दिल्याने महान व्यक्तीचा सन्मान होतो आणि तरूणांसमोर आदर्श उभा राहतो.

यंदाचा पुरस्कार कुणाला देण्यात यावा, यावर चर्चा करण्यासाठी सर्व विश्वस्त चर्चा करण्यासाठी बसले. तेव्हा आमच्यासमोर केवळ एकच नाव आलं, ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी

लोकमान्य टिळक यांनी स्वतंत्र, आधुनिक आणि बलाढ्य भारताचं स्वप्न पाहिलं होतं. राष्ट्रीयत्व, भारताची पुरातन विद्या, राष्ट्रप्रेम, स्वदेशी, स्वदेशी अर्थकारण लोकमान्य टिळकांनी सांगितलं होतं. तोच विचार पंतप्रधान मोदी यांच्या कार्यातही दिसतो.

आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया, नवे तंत्रज्ञान, नवे शैक्षणिक धोरण या सारख्या कार्यात टिळकांचा विचार दिसतो. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांचा सन्मान करताना आम्हाला मनोमन आनंद होत आहे.

Prime Minister Modi’s eulogy at the Tilak Award ceremony

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात