विशेष प्रतिनिधी
बरेली – उत्तर भारतात कावड यात्रेला अनन्यसाधारण असे महत्व आहे. मात्र कोरोनामुळे या यात्रेवर बंदी असल्याने भाविकांत नाराजी आहे. यावर उपाय काढण्यासाठी सरकारने नामी शक्कल लढविली असून त्याला भाविकांचा उत्तम प्रतिसादही मिळू लागला आहे. सरकारने भाविकांसाठी चक्क पोस्टात गंगाजल मिळण्याची सोय केली आहे. त्यामुळे भाविक जाम खूष झाले आहेत. Gangajal now get in post office also
राज्यात कोरोनामुळे कावड यात्रेवर बंदी घालण्यात आल्याने पोस्ट कार्यालयातून गंगाजल उपलब्ध करून देण्यात आले. गंगाजलच्या बाटल्या खरेदी करण्यासाठी अनेक भाविक पोस्ट कार्यालयात जात आहेत. एकट्या बरेलीतच गेल्या सहा दिवसांत ३५० बाटल्या विकल्या गेल्या.
पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये ३०० हून अधिक पोस्ट कार्यालयात गंगाजलच्या बाटल्या विक्रीसाठी ठेवल्याची माहिती पोस्ट मास्टर जनरल संजय सिंह यांनी दिली. निर्बंधामुळे लोक उत्तराखंडमधील गंगोत्रीला जाऊन गंगाजल आणू शकत नाहीत. त्यामुळे, पोस्टाच्या निवडक कार्यालयात गंगाजलच्या बाटल्या ठेवल्या असून २५० मि.मी.च्या बाटलीची किंमत ३० रुपये आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App