गांधी हत्येच्या दीर्घकालीन दुष्परिणामातून भारताचे व्यापार, संरक्षण आणि परराष्ट्र धोरण ब्रिटिश अंकितच; रणजित सावरकरांचा आरोप!!

नाशिक : महात्मा गांधींच्या हत्येचा दीर्घकालीन दुष्परिणाम भारताच्या व्यापार, संरक्षण आणि परराष्ट्र धोरणावर झाला. हे धोरण मिळमिळीत आणि ब्रिटिश अंकित राहिले. कारण ब्रिटनला हव्या असलेल्या पंतप्रधानाने भारतावर दीर्घकाळ राज्य केले, असा थेट आरोप स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी राज केला. रणजित सावरकर यांनी गांधी हत्या संदर्भात नेहरुंनी नेमलेल्या कपूर कमिशनच्या अहवालाच्या आधारावर “मेक शुअर गांधी इज डेड” हे पुस्तक लिहिले. या पुस्तकामध्ये रणजित सावरकरांनी गांधी हत्येचे परिणाम भारतावर कसे झाले आणि कोणकोणत्या क्षेत्रांवर झाले??, याचा आढावा घेतला. Gandhi assassination long term impact on Indian trade, defence and foreign policy, India remained British stooge!!

या संदर्भात thefocusindia.com शी बोलताना रणजित सावरकर यांनी एक स्पष्ट खुलासा देखील केला. नथुराम गोडसेने महात्मा गांधींची हत्या करण्याचे आधी देखील प्रयत्न केले होते. परंतु ते प्रयत्न फसले. नथुरामला गांधींची हत्या करायची होती हे 100 % खरे आहे. त्याने गोळ्या झाडल्या हे देखील खरे आहे. परंतु तो नवखा होता. त्याला मनुबेनने अडवले. त्यामुळे त्याने एकाच हाताने गोळ्या झाडल्या आणि त्या गोळ्या त्याच्याच पायाशी पडल्या. नथुरामच्या गोळ्यांमुळे गांधींचा मृत्यू झाला नाही. त्या गोळ्या कुणीतरी दुसऱ्यानेच झाडल्या होत्या. गांधी हत्येचा या संदर्भात तपास झाला पाहिजे. कारण नथुरामवर 307 कलमानुसार हत्येचा प्रयत्न म्हणून खटला चालला असता. त्याबद्दल त्याला जास्तीत जास्त 10 वर्षे शिक्षा झाली असती. परंतु, तत्कालीन नेहरू सरकारने गांधीसाठी जबाबदार धरून नथुराम गोडसेंना फाशी दिले.

रणजित सावरकर म्हणाले, की प्रत्यक्षात गांधी हत्येचे दीर्घकालीन दुष्परिणाम भारताच्या व्यापार, संरक्षण आणि परराष्ट्र धोरणावर झाले. भारताचे शेवटचे व्हाईसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांच्या व्यक्तिगत संबंधांमधून पंडित नेहरू भारताच्या पंतप्रधानपदी त्यांना नेमता आले. नेहरूंनी देशाच्या व्यापार, संरक्षण आणि परराष्ट्र धोरणाशी तडजोड केली. ब्रिटनला हवे तसे संरक्षण, परराष्ट्र आणि व्यापारी धोरण आखले. ब्रिटनकडून त्यांची भंगारात गेलेली संरक्षण सामग्री खरेदी केली. याचे परिणाम आपल्याला पाकिस्तान बरोबर झालेल्या दोन युद्धांमध्ये देखील भोगावे लागले. भारताचे अमेरिकेशी दीर्घकाळापर्यंत म्हणजे 1975 पर्यंत व्यापारी संबंध खऱ्या अर्थाने दृढमूलच होऊ शकले नाहीत. त्या उलट पाकिस्तानचे अमेरिकेशी संबंध वाढले आणि त्यांना भारतापेक्षा अद्ययावत संरक्षण सामग्री मिळत गेली, याकडे रणजित सावरकरांनी आवर्जून लक्ष वेधले.

गांधी हत्येचे राजकीय परिणाम

गांधी हत्येचे राजकीय परिणाम देखील झाले. सरदार वल्लभभाई पटेल यांनी गांधीजींना संरक्षण दिले नाही म्हणून त्यांच्यावर ठपका ठेवता आला. पण सरदार पटेल यांनी मूळातच आधी राजीनामा दिला होता. शिवाय इंटेलिजन्स ब्युरो फक्त पंतप्रधानांना रिपोर्ट करत होता. गांधी हत्येच्या ठिकाणी अनेकांनी मुस्लिमाने त्यांची हत्या केल्याचे वक्तव्य केले, पण माउंटबॅटन यांनी खात्रीने तो मुस्लिम नव्हे, हिंदूच आहे, असे सांगितले. याचा अर्थच त्यांना कोणत्यातरी हिंदूवरच गांधी हत्येचा ठपका ठेवायचा होता. त्यातून आपला मूळ हेतू साध्य करून घ्यायचा होता हे स्पष्ट दिसून येते, असे रणजित सावरकर यांनी सांगितले.

गांधी हत्येच्या आरोपात गोवल्यामुळे नेहरूंना स्वातंत्र्यवीर सावरकरांची राजकीय कारकीर्द संपवता आली. हिंदू महासभेला 1946 च्या निवडणुकीत 16.5 % टक्के मते मिळाली होती. तो देशातला एक प्रमुख पक्ष होता. हा पक्ष गांधी हत्येच्या निमित्ताने नेहरू सरकारला संपवता आला. परिणामी नेहरू – गांधी परिवाराचे वर्चस्व सुरुवातीपासून देशावर वाढविता आले, असे महत्त्वपूर्ण निरीक्षणही रणजित सावरकर यांनी नोंदविले.

Gandhi assassination long term impact on Indian trade, defence and foreign policy, India remained British stooge!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात