
मोदी हॉटेलमध्ये पोहोचताच तिथे जमलेल्या भारतीयांनी मोदींच्या स्वागतासाठी जल्लोष सुरू केला. मोदींनी स्वागतासाठी उपस्थित असलेल्या भारतीय लोकांमधल्या एका लहान मुलाशी संवादही साधला.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी ग्लास्गोला, ब्रिटन येथे पोहोचले आणि तिथे मोदींच भारतीयांनी जोरदार स्वागत केलं. ‘मोदी है भारत का गेहना’ गाणं गाऊन सुरेल स्वागत करण्यात आलं .मोदी हॉटेलमध्ये पोहोचताच तिथे जमलेल्या भारतीयांनी मोदींच्या स्वागतासाठी जल्लोष सुरू केला. मोदींनी स्वागतासाठी उपस्थित असलेल्या भारतीय लोकांमधल्या एका लहान मुलाशी संवादही साधला. G20 Summit COP26 PM Modi welcomed by Indians in Glasglow UK singing song Modi Hai Bharat Ka Gehna
- G20 Summit: पंतप्रधान मोदी आज ब्रिटनला ; हवामान बदल आणि पर्यावरणावरील परिषद;काय आहे परिषदेचा अजेंडा?
#WATCH | Glasgow, UK | Indian community sings 'Modi Hai Bharat Ka Gehna' during interaction with Prime Minister Narendra Modi after his arrival at the hotel. pic.twitter.com/Hq2y7bSWEd
— ANI (@ANI) October 31, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवस- 1 आणि 2 नोव्हेंबरला ग्लासगो, ब्रिटनच्या दौऱ्यावर आहेत. ब्रिटनमध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या 26 व्या हवामान बदलावरील जागतिक परिषदेत (United Nation’s Conference of Parties (COP26) on Climate Change) ते सहभागी देखील झाले . हे G20 शिखर परिषदेचं दुसर सत्र आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधान मोदींना आमंत्रित केले आहे.
G20 शिखर परिषदेच्या पहिल्या सत्रासाठी मोदी तीन दिवस रोम, इटलीमध्ये होते. रोममधुन निघतांना पंतप्रधान मोदी म्हणाले की, रोम शिखर परिषदेदरम्यान, महामारीशी लढा, आरोग्य पायाभूत सुविधा सुधारणे, आर्थिक सहकार्याला चालना देणे आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांना चालना देणे यासारख्या जागतिक महत्त्वाच्या मुद्द्यांवर विस्तृत चर्चा झाली.
COP26 शिखर परिषदेत हवामान बदल कमी करण्यासाठी, या संदर्भात भारताच्या प्रयत्नांना स्पष्ट करण्यासाठी आणि इतर जागतिक नेत्यांसोबत काम करण्यासाठी मी उत्सुक आहे, असं पंतप्रधान मोदीं म्हणाले.
Landed in Glasgow. Will be joining the @COP26 Summit, where I look forward to working with other world leaders on mitigating climate change and articulating India’s efforts in this regard. pic.twitter.com/G4nVWknFg1
— Narendra Modi (@narendramodi) October 31, 2021
G20 शिखर परिषदेचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणून पाहिले जात आहे. जवळजवळ 200 देशांचे प्रमुख या परिषदेत उपस्थित असतील. G20 ब्लॉक मध्ये जागतिक हरितगृह वायू उत्सर्जनाचा (Greenhouse gases emissions) अंदाजे 80 टक्के वाटा हा ब्राझील, चीन, भारत, जर्मनी आणि युनायटेड स्टेट्स यांचा आहे. चीन आणि युनायटेड स्टेट्स नंतर भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा हरितगृह वायू उत्सर्जित करणारा देश आहे.
G20 Summit COP26 PM Modi welcomed by Indians in Glasglow UK singing song Modi Hai Bharat Ka Gehna
महत्त्वाच्या बातम्या
- ममतांच्या बेगमीसाठी सुशासनाच्या घोषणेला अरविंद केजरीवाल यांची तिलांजली, मोफत यात्रांचे दिले आश्वासन
- अखिलेश यादव यांना जिन्नांचा इतका पुळका की असुद्दीन ओवेसी यांनीही फटकारले
- प्रियंका गांधी यांनी रात्री अटक करणाऱ्या पोलीसांवर मानवाधिकार आयोगाकडून गुन्हा
- कोरोनामुळे मंदावलेली अर्थव्यवस्था पुन्हा गतीमान, जीएसटीच्या करसंकलनात मोठी वाढ
Array