वृत्तसंस्था
रिओ दी जानेरिओ : Mansarovar Yatra ब्राझीलची राजधानी रिओ दि जानेरो येथे दोन दिवसीय G20 शिखर परिषद संपन्न झाली. यादरम्यान भारत आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये चर्चा झाली. यामध्ये दोन्ही देशांमधील सीमावादावर 5 वर्षांनंतर विशेष प्रतिनिधींची बैठक बोलावण्याचे मान्य करण्यात आले.Mansarovar Yatra
परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी सांगितले की, भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी दोन्ही देशांमधील थेट विमानसेवा आणि कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करण्याबाबत चर्चा केली. कोविड महामारीपासून या दोन्हीवर बंदी घालण्यात आली होती.
फोटो सेशनमध्ये बिडेन आणि ट्रुडो यांच्यासोबत मोदी दिसले
शिखर परिषदेच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान मोदी अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन आणि कॅनडाचे राष्ट्राध्यक्ष जस्टिन ट्रूडो यांच्यासोबत दिसले. भारत आणि कॅनडा यांच्यातील वाद गेल्या वर्षी झालेल्या G20 परिषदेनंतर सुरू झाला होता. कॅनडाच्या पंतप्रधानांनी भारतावर खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरची हत्या केल्याचा आरोप केला होता.
G20 जाहीरनाम्यात युक्रेनमधील युद्ध थांबवणे आणि गाझाला अधिक मदत देण्याचा उल्लेख
2025 मध्ये होणाऱ्या पुढील शिखर परिषदेचे यजमानपद भूषवण्याची संधी दक्षिण आफ्रिकेला मिळाली आहे. सर्व सदस्यांनी जारी केलेल्या संयुक्त घोषणेमध्ये भूकेशी लढण्यासाठी जागतिक करार, युद्धग्रस्त गाझासाठी अधिक मदत आणि मध्य पूर्व आणि युक्रेनमधील लढाई संपविण्याचे आवाहन करण्यात आले.
तिसऱ्या सत्रानंतर मोदींनी ब्राझीलचे अध्यक्ष लुला दा सिल्वा, चिलीचे अध्यक्ष गॅब्रिएल बोरिक, अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष जेवियर मिली आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्याशी द्विपक्षीय बैठका घेतल्या.
ब्राझीलचे राष्ट्रपती लुला दा सिल्वा यांनी मोदींसोबतच्या भेटीदरम्यान, गेल्या वर्षी नवी दिल्लीत झालेल्या G20 च्या यशस्वी आयोजनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले. ते म्हणाले-भारताने मागच्या वर्षी जशी G20 शिखर परिषद आयोजित केली होती तशीच आमची इच्छा होती. तिथून खूप काही शिकायला मिळाले. आपण असे काहीतरी करू शकू अशी माझी इच्छा होती.
लुला दा सिल्वा म्हणाले की, G20 शिखर परिषदेत ब्राझीलने उचललेली पावले गेल्या वर्षी G20 मध्ये भारताने घेतलेल्या निर्णयांपासून प्रेरित आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App