वृत्तसंस्था
सिडनी : गलवान हिंसाचारात ४२ चिनी सैनिकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त ऑस्ट्रेलियन वृत्तपत्र द क्लॅक्सनने २ फेब्रुवारी रोजी दिले होते. तर चीनने केवळ ४ सैनिकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. परंतु भारतीय लष्कराशी लढताना चिनी सैनिक घाबरले होते. ते माघार घेताना त्यांनी नदीत उड्या टाकल्या. एकामागून एक असे ३८ चिनी नदीत वाहून गेले होते, असे वृत्तात म्हंटले आहे. Frightened, the Chinese soldiers plunged into the river And drown ; There was also information on Chinese social media
द क्लॅक्सनचे संपादक अँथनी क्लान यांनी एनडीटीव्हीला एका मुलाखतीत सांगितले की, भारतीय सैनिक करारानुसार चिनी सैनिकांनी बफर झोनमधून त्यांचे तळ हटवले आहेत की नाही हे पाहण्यासाठी गेले होते. यादरम्यान दोन्हीकडचे सैनिक एकमेकांशी भिडले. याचे पुरावेही आहेत. ही सर्व माहिती चीनच्या सोशल मीडियावर प्रथम उपलब्ध होती.जी नंतर काढून टाकली.
‘न्यूज वीक’ या अमेरिकन वृत्तपत्राने एका वर्षांपूर्वी एक वृत्त दिले होते. त्यात म्हंटले होते की,१५ जून रोजी गलवानमध्ये झालेल्या चकमकीत ६० हून अधिक चिनी सैनिक मारले गेले. क्लॅक्सनने म्हटले आहे की,६ जून रोजी भारत आणि चीनमध्ये करार झाला होता. त्यात दोन्हीकडचे सैन्य बफर झोनमधून माघार घेतील. भारतीय लष्कराचे कर्नल संतोष बाबू आणि त्यांचे सैनिक १५ जून रोजी चिनी सैनिकांनी आपले तळ हटविले आहेत की नाही, याची पाहणी करण्यासाठी गेले होते.तेव्हा पीएलएचे कर्नल क्यूई फाबाओ सुमारे १५० सैनिकांसह येथे उपस्थित होते. त्यांनी माघार घेतली तर नाहीच शिवाय ते आक्रमक झाले आणि लढू लागले.
भारतीय सैनिकांवर हल्ला करण्यासाठी चिनी सैनिकांनी स्टील पाईप, काठ्या आणि दगडांचा वापर केला. यादरम्यान एका भारतीय जवानाने कर्नल फाबाओ यांच्या डोक्यावर हल्ला केला. त्यानंतर ते घाबरून पळून गेले. आपल्या अनेक अधिकाऱ्यांचे मृतदेह पाहून पीएलएचे सैनिक इतके घाबरले की त्यांनी वॉटरप्रूफ कपडे न घालता बर्फाळ नदीत उडी मारली. नदीची पातळी अचानक वाढल्याने ते वाहून गेले.
सुमारे दीड वर्षांच्या संशोधनानंतर ‘गलवान डीकोडेड’ रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, चीनने गलवानचे सत्य लपवण्यासाठी दोन वेगवेगळ्या घटनांची सांगड घातली. चीनने गलवानमध्ये ठार झालेल्या सैनिकांची नेमकी संख्या कधीच दिली नाही आणि गेल्या वर्षी चकमकीत मारल्या गेलेल्या एकूण ४ सैनिकांना पदक जाहीर केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App