कोरोना विरुध्दच्या लढाईत देशातील सर्व केंद्रीय मंत्रालयांनी एल्गार पुकारला आहे. आता रेल्वेच्या रुग्णालयांमध्ये सामान्य नागरिकांसाठीही मोफत कोरोना चाचणी होणार आहे. त्याचबरोबर रेल्वेच्या रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या नागरिकांना मोफत जेवणही दिले जाणार आहे.Free corona testing and treatment for citizens now in railway hospitals
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना विरुध्दच्या लढाईत देशातील सर्व केंद्रीय मंत्रालयांनी एल्गार पुकारला आहे. आता रेल्वेच्या रुग्णालयांमध्ये सामान्य गरिकांसाठीही मोफत कोरोना चाचणी होणार आहे.
त्याचबरोबर रेल्वेच्या रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या नागरिकांना मोफत जेवणही दिले जाणार आहे.देशातील अनेक शहरांमध्ये रेल्वेची रुग्णालये आहेत. याठिकाणी रेल्वेचे कर्मचारी वगळता सामान्य नागरिकांनाही उपचार मिळतात.
परंतु, त्यांना त्यासाठी शुल्क मोजावे लागते. कोरोनाच्या महामारीत नागरिकांना दिलासा देण्यासाठी रेल्वेने मोफत उपचार देण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे बोर्डाच्या बैठकीत कोरोना विरुध्दच्या लढाईत पूर्ण क्षमतेने उतरण्याचा निर्णय घेण्यात आला.
रेल्वेच्या रुग्णालयांमध्ये आता उपचाराच्या सुविधा वाढविण्यात येणार आहेत. त्याचबरोबर कोराना काळात ऑक्सिजनची कमतरता असल्याने जास्तीत जास्त ऑक्सिजन एक्सप्रेस चालविण्याचा निर्णयही घेण्यात आला. देशातील विविध शहरांना जोडणाऱ्या रेल्वेची सेवाही चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App