सात सेकंद मृत्यूच्या दिशेने धावत रेल्वेच्या पॉइंटमने वाचविला चिमुकल्याचा जीव


विशेष प्रतिनिधी 

मुंबई : समोरून तुफान वेगाने रेल्वे येतेय. जीवन आणि मृत्यूमध्ये अंतर केवळ सात सेकंदाचे. पण स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तो जणू मृत्यूच्या दिशेनेच पळत सुटला आणि चिमुकल्याला मृत्यूच्या जबड्यातून परत आणले.Railway pointsman sabes chile by running towards death for seven seconds

रेल्वेच्या पॉइंटमने चिमुकल्‍याचे प्राण वाचवण्याचा थरार सीसीटीव्ही कॅमेरात चित्रीत झाला आहे.माध्यरेल्वेच्या वांगणी स्थानकावर शनिवारी एक अंध महिला रेल्वे स्थानकावर उभी होती.अचानक तिच्याजवळचा लहान मुलगा हा रेल्वे ट्रॅक वर पडला. त्याच वेळेस 5 वाजून 17 मिनिटांच्या सुमारास उद्यान एक्सप्रेस रेल्वे स्थानकावर येत होती. घाबरलेेेली ती अंध महिला आपल्या मुलाला बाहेर काढण्यासाठी अतोनात प्रयत्न करत होती.

मात्र तिला फलाटाचा अंदाज येत नसल्याने ती चाचपडत होती. त्याच वेळेस ड्युटीवर असलेला मयूर शेळके हा ट्रेकमधून तिथे धावत आला आणि त्याने क्षणार्धात त्या मुलाला फलाटावर उचलून स्वतःही फलाटावर गेला. अक्षरशः काही सेकंदाच्या मयूर शेळके यांच्या सतर्कतेमुळे या मुलाचे प्राण वाचले.

जीवावर उदार होऊन मयूर शेळके याने या चिमुकल्याचे प्राण वाचवले. क्षणार्धात काही विलंब झाला असता तर शेळके आणि त्या मुलाचा जीव जागीच गेला असता. मात्र आपल्या जीवाची पर्वा न करता त्या मुलाला जीवदान दिले.

Railway pointsman sabes chile by running towards death for seven seconds

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण