बिहारमध्ये शाळेतील ध्वजारोहणादरम्यान दुर्दैवी अपघात, विजेच्या धक्क्याने चौघे गंभीर भाजले, एका मुलाचा मृत्यू


बिहारमधील बक्सरमध्ये ध्वजारोहण करताना मोठी दुर्घटना घडली आहे. विजेच्या धक्क्याने एका मुलाचा मृत्यू झाला, तर अनेक मुले गंभीर जखमी झाली. जखमींवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. Four children burnt one died in unfortunate accident during school flag hoisting in Bihar baxar


वृत्तसंस्था

पाटणा : बिहारमधील बक्सरमध्ये ध्वजारोहण करताना मोठी दुर्घटना घडली आहे. विजेच्या धक्क्याने एका मुलाचा मृत्यू झाला, तर अनेक मुले गंभीर जखमी झाली. जखमींवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बक्सरच्या नथुपूर प्राथमिक शाळेत झेंडा फडकवताना शाळकरी मुलांना विजेचा धक्का लागल्याने एक मोठा अपघात झाला, यात एका मुलाचा मृत्यू झाला, तर 4 मुले गंभीर जखमी झाली आहेत. त्यांच्यावर बक्सर सदर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेची माहिती देताना मुलांच्या कुटुंबीयांनी सांगितले की, मुले ध्वजारोहण करण्यासाठी शाळेत पोहोचत असताना ध्वज घेऊन जाणाऱ्या पाईपमध्ये करंट उतरला, त्यामुळे शाळकरी मुलांना धक्का बसला. डॉक्टरांच्या माहितीनुसार, रुग्णालयात आलेल्या या मुलांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे, तर इतर मुलांवर उपचार सुरू आहेत.या घटनेनंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून मुलांचे कुटुंबीय रडून आक्रोश करत आहेत. स्थानिक प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून मुलांवर योग्य उपचार करण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. याशिवाय या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला जात आहे की, पाईपमध्ये करंट कसा आला?

विशेष म्हणजे प्रजासत्ताक दिनानिमित्त देशातील सर्व शाळांमध्ये ध्वजारोहणाचे आयोजन करण्यात आले होते. तिरंगा फडकवण्यासाठी मुले शाळेत पोहोचली होती. ध्वजारोहणापूर्वी मुलांनी ध्वजाच्या पाईपला हात लावला तेव्हा त्यांना धक्काच बसला. यादरम्यान एका मुलाचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.

या अपघाताची माहिती मिळताच माजी मंत्री संतोष निराला आणि काँग्रेस आमदार विश्वनाथ राम यांनी रुग्णालयात पोहोचून मुलांच्या कुटुंबीयांची विचारपूस केली. त्याचबरोबर बिहार सरकारचे माजी मंत्री संतोष निराला यांनीही या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. सध्या अपघातात जखमी झालेल्या मुलांची प्रकृती सामान्य आहे. ही घटना वीज विभागाच्या निष्काळजीपणाची असून दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे, असे काँग्रेस आमदार विश्वनाथ राम यांनी म्हटले आहे.

Four children burnt one died in unfortunate accident during school flag hoisting in Bihar baxar

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*