संपूर्ण राज्यात प्रचार करण्यास वेळ मिळावा म्हणून उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत स्वत; लढणार नाहीत निवडणूक


विशेष प्रतिनिधी

डेहराडून: उत्तराखंडमध्ये संपूर्ण राज्यात प्रचार करण्यास वेळ मिळावा यामुळे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी आगामी विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत त्यांनी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना पत्र लिहिले आहे.Former Uttarakhand Chief Minister Trivendra Singh Rawat will not contest the election to give time to campaign across the state

नड्डा यांना लिहिलेल्या पत्रात रावत यांनी म्हटले आहे की, पक्षाचा राज्यात विजय होणे सुकर व्हावे यासाठी आपण निवडणूक लढविणार नाही. त्यामुळे आपण संपूर्ण वेळ राज्यात प्रचार करण्यास देऊ शकतो. गेल्या वर्षी मार्चमध्ये त्रिवेंद्रसिंग रावत यांच्या जागी तीरथसिंग रावत यांच्या जागी पुष्कर धामी यांची मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केली होती.उत्तराखंड विधानसभेतील डोईवाला मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे त्रिवेंद्र सिंह रावत म्हणाले की, राज्यातील बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे निवडणूक लढवू नये असे त्यांना वाटते. ते म्हणाले, राज्याला पुष्कर धामी हा तरुण नेता मिळाला आहे. त्यामुळे माझ्या भावना मी अगोदरच पक्षाला कळविल्या आहेत.

त्रिवेंद्र सिंह रावत यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्ष नेतृत्वाचे आभार व्यक्त केले. मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात आपल्याला पंतप्रधानांकडून खूप पाठिंबा आणि आशिर्वाद मिळाला.

Former Uttarakhand Chief Minister Trivendra Singh Rawat will not contest the election to give time to campaign across the state

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात