ज्येष्ठ विधीज्ञ श्रीकांत शिवदे यांचे दीर्घ आजाराने निधन


प्रतिनिधी

पुणे : अभिनेता सलमान खान यांचे बांद्रे येथील “हिट अँड रन प्रकरण’, दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या बलात्कार प्रकरणासह बॉलिवुडच्या विविध कलाकारांचे वकील असलेले ज्येष्ठ विधिज्ञ श्रीकांत शिवदे यांचे निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. वर्षभरापासून ते कर्करोगाने आजारी होते. बुधवारी त्यांची प्राणज्योत मालवली.Senior lawyer Shrikant Shivde no more

ते फौजदारी निष्णात होते. सत्र न्यायालयासह उच्च आणि सर्वोच्च न्यायालयातही त्यांनी अनेक खटल्यात कामाचा ठसा उमटविला होता.

ऍड. श्रीकांत शिवदे यांनी ज्येष्ठ विधीज्ञ विजयराव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली वकिली व्यवसाय सुरु केला. खासदार ऍड. वंदना चव्हाण, ऍड. हर्षद निंबाळकर, ऍड. विराज काकडे, ऍड. विजय सावंत यांच्यासमवेत त्यांनी एकत्रित काम केले.

पुणे बार असोशिएशनचे ते उपाध्यक्ष होते. प्रसिद्ध हिरे व्यापारी आणि फिल्म फायनान्सर भरत शहा यांच्याविरुद्ध अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलला मदत केल्याचा खटला त्यांनी लढविला होता. मालेगाव बॉम्ब ब्लास्टमधील लेफ्टनंट प्रसाद पुरोहित यांचे ते वकील होते.
गुंतवणूकदारांची फसवणूक प्रकरणात प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांचे वकील म्हणूनही त्यांनी बाजू मांडली होती.

Senior lawyer Shrikant Shivde no more

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात