Former UP CM Kalyan singh : यूपीचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह आज पंचत्वात विलीन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी 4 वाजता नरोरा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या मुलाने मुखाग्नी दिला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते यावेळी उपस्थित होते. सीएम योगींसह हजारो लोकांनी कल्याण सिंह यांना अखेरचा निरोप दिला. Former UP CM Kalyan singh last rites today aligarh to madauli village
विशेष प्रतिनिधी
लखनऊ : यूपीचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह आज पंचत्वात विलीन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी 4 वाजता नरोरा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या मुलाने मुखाग्नी दिला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते यावेळी उपस्थित होते. सीएम योगींसह हजारो लोकांनी कल्याण सिंह यांना अखेरचा निरोप दिला.
शनिवारी रात्री 9.30 वाजता त्यांचे निधन झाले. त्यांनी वयाच्या 89व्या वर्षी लखनऊच्या पीजीआय रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. कल्याण सिंह बऱ्याच काळापासून अनेक आजारांशी लढत होते. शुक्रवारपासून त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर होती. सकाळपासूनच त्याचा रक्तदाब कमी होऊ लागला होता.
डॉक्टरांनी म्हटले की, त्यांना लघवीला जाताना त्रास होत असल्याने डायलिसिसवर ठेवण्यात आले होते. अनेक प्रयत्न करूनही त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. शनिवारी रात्री 9.30 वाजता त्यांचे निधन झाले. श्रीराम भक्त आणि भाजपचे ज्येष्ठ नेते कल्याण सिंह यांचे पार्थिव यापूर्वी लखनऊ येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले होते. तेथे पीएम मोदींसह अनेक दिग्गजांनी अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली.
रविवारी, संध्याकाळी 6 वाजता त्यांचे पार्थिव अलिगढच्या अहिल्याबाई होळकर स्टेडियमवर आणण्यात आले. या वेळी मुख्यमंत्री योगी त्यांच्यासोबत उपस्थित होते. आज मुख्यमंत्री योगी, गृहमंत्री अमित शहा, राजनाथ सिंह यांच्यासह भाजपचे अनेक दिग्गज नेते माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांच्या अंत्यदर्शनाला उपस्थित होते.
Former UP CM Kalyan singh last rites today aligarh to madauli village
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App