विशेष प्रतिनिधी
कोलकता – तृणमूल काँग्रेसचे माजी मंत्री श्यामाप्रसाद मुखर्जी यांना रविवारी १० कोटी रुपयांच्या आर्थिक अनियमततेतील सहभागाच्या आरोपावरून अटक करण्यात आली. मुखर्जी यांनी पश्चिम बंगालमधील काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीआधी भाजपमध्ये प्रवेश केला होता.Former TMC minister arrested in west Bengal
दरम्यान, मुखर्जी यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी ते पक्षात सक्रिय नव्हते, असा दावा भाजप नेते सुजित अगस्थी यांनी केला. त्यांच्यावरील आरोप ते तृणमूलमध्ये होते तेव्हाचे आहेत. सरकार आता जागे झाले, का असा सवालही त्यांनी केला.
भाजपमध्ये व्यक्तीच्या टीम नसतात, मंत्रीपद न मिळाल्याने नाराजीचा प्रश्नच नाही; पंकजा मुंडेंचे स्पष्टीकरण
मुखर्जी पश्चिम बंगालमधील बिष्णूपूरचे माजी आमदारही आहेत. २०२० मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचे अध्यक्ष असताना ई-टेंडर व इतर प्रकरणातील आर्थिक अनियमततेच्या आरोपावरून त्यांना पोलिसांनी अटक केली.
याप्रकरणी नऊ कोटी ९१ लाख रुपयांची आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप आहे. बिष्णूपूर पोलिस ठाण्याने याबाबत तपास केला होता.तपासादरम्यान मुखर्जी पोलिसांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. त्यामुळे, त्यांना अटक केली, अशी माहिती बंकुराचे पोलिस अधीक्षक धृतिमान सरकार यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App