Tarun Tejpal acquitted of all charges : ‘तहलका’ मासिकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांची लैंगिक शोषणाच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाली आहेत. तरुण तेजपाल यांच्यावर गेल्या 8 वर्षांपासून हा खटला चालू होता. एका लिफ्टमध्ये त्यांच्या सहकाऱ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. तरुण तेजपाल मे 2014 पासून जामिनावर बाहेर होते. Former Editor-in-Chief of Tehelka Magazine Tarun Tejpal acquitted of all charges in alleged sexual assault case
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ‘तहलका’ मासिकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांची लैंगिक शोषणाच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाली आहेत. तरुण तेजपाल यांच्यावर गेल्या 8 वर्षांपासून हा खटला चालू होता. एका लिफ्टमध्ये त्यांच्या सहकाऱ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. तरुण तेजपाल मे 2014 पासून जामिनावर बाहेर होते.
एका महिलेने तरुण तेजपाल यांच्यावर गोव्यातील पंचतारांकित हॉटेलमध्ये एका लिफ्टच्या आत तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला. त्यानंतर नोव्हेंबर 2013 मध्ये त्यांना अटक करण्यात आली होती. नंतर जामिनावर सोडण्यात आले. या खटल्याची सुनावणी सुरू असताना गोवा पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध फेब्रुवारी 2014 मध्ये 2846 पृष्ठांचे आरोपपत्र दाखल केले होते.
अतिरिक्त जिल्हा कोर्टाने 27 एप्रिल रोजी निकाल देण्याचे ठरवले होते, परंतु न्यायाधीश क्षमा जोशी यांनी हा निर्णय 12 मेपर्यंत तहकूब केला. 12 मे रोजी पुन्हा हा निर्णय 19 मेपर्यंत तहकूब करण्यात आला. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कर्मचार्यांच्या कमतरतेमुळे हा निकाल पुढे ढकलला जात होता, असे कोर्टाने यापूर्वी सांगितले होते. तरुण तेजपाल यांनी यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत त्यांच्यावरील आरोप निश्चितीवर स्थगिती मागितली होती, परंतु त्यांची याचिका फेटाळण्यात आली होती.
Former Editor-in-Chief of Tehelka Magazine Tarun Tejpal acquitted of all charges in alleged sexual assault case
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App