वृत्तसंस्था
हैदराबाद : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. रोसय्या (वय ८८) यांचे निधन झाले. सकाळी त्यांना बरे वाटत नसल्याने रुग्णालयात दाखल केले होते. तेथे त्यांचे निधन झाले, असे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले. Former CM K Rossya no more
वायएसआर यांचे २००९मध्ये आकस्मिक निधन झाल्यानंतर अर्थमंत्री असलेल्या रोसय्या यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाली होती. ते २०११ ते २०१६ या कालावधीत तमिळनाडूचे राज्यपालही होते. रोसय्या यांची राजकीय कारकीर्द १९६८ मध्ये० विधान परिषदेचे आमदाराच्या रूपात सुरू झाली होती. तत्कालीन मुख्यमंत्री विजयभास्कर रेड्डी व वाय.एस. राजशेखर रेड्डी यांच्या मंत्रिमंडळात रोसय्या यांनी काम केले होते.
तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी रोसय्या यांच्या निधनाने दुःख व्यक्त केले. रोसय्या त्यांनी जी पदे भूषविली त्याची शान वाढविली. संयम, साधेपणा व सभ्यता ही त्यांची वैशिष्ट्ये होतीस असे राव म्हणाले. तेलंगण प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष रेवंत रेड्डी यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App