वृत्तसंस्था
नवी दिल्ली : Vijay Shankar सीबीआयचे माजी संचालक विजय शंकर यांचे मंगळवारी दीर्घ आजाराने निधन झाले. 76 वर्षीय शंकर यांना काही काळ नोएडा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या शेवटच्या इच्छेनुसार विजय शंकर यांचे पार्थिव एम्समध्ये दान करण्यात येणार असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.Vijay Shankar
उत्तर प्रदेश केडरचे 1969 बॅचचे आयपीएस अधिकारी विजय शंकर यांनी 12 डिसेंबर 2005 ते 31 जुलै 2008 या कालावधीत सीबीआयचे संचालक म्हणून काम पाहिले. त्यांच्या कार्यकाळात एजन्सीने अनेक हाय-प्रोफाइल प्रकरणांची चौकशी केली.
हाय-प्रोफाइल प्रकरणांची चौकशी केली
विजय शंकर यांनी सीबीआयचे संचालक असताना आरुषी-हेमराज दुहेरी हत्याकांडाचा तपास केला होता. याशिवाय ते सीबीआयचे अतिरिक्त संचालक असताना त्यांच्या देखरेखीखाली गुंड अबू सालेम आणि अभिनेत्री मोनिका बेदी यांचे पोर्तुगालमधून प्रत्यार्पण करण्यात आले होते. तेलगी घोटाळ्याच्या (स्टॅम्प पेपर घोटाळा) तपासातही त्यांचा सहभाग होता.
बीएसएफमध्ये महानिरीक्षक म्हणूनही काम केले
सीबीआय संचालक होण्यापूर्वी शंकर यांनी एनडीआरएफ (नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स), नागरी संरक्षण आणि होमगार्ड्सचे प्रमुख म्हणून काम केले होते. त्यांनी सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) महानिरीक्षक म्हणूनही काम केले आहे. 1990 च्या दशकात जेव्हा जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया शिगेला पोहोचल्या होत्या, तेव्हा शंकर तिथे तैनात होते.
मॉस्कोमध्येही काम केले आहे
परराष्ट्र मंत्रालयात असताना विजय शंकर यांनी मॉस्कोमध्येही काम केले आहे. याशिवाय त्यांनी उत्तर प्रदेश पोलिसातही काम केले आहे. शंकर यांना राष्ट्रपती पोलिस पदकही मिळाले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App