विशेष प्रतिनिधी
मुंबई : महायुतीचे सरकार महाराष्ट्रात स्थापन होत असताना अजित दादांची शपथ घेण्याची उताविळी आणि शिंदेंनी मारली कोपरखळी!!, असे आज राजभवनात घडले.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार स्थापनेचा दावा केला. त्यानंतर एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी एक किस्सा घडला.
तो असा :
देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना आपल्या मंत्रिमंडळात सहभागी होण्याची विनंती केली ते आपल्याला सकारात्मक प्रतिसाद देखील असा आशावाद व्यक्त केला त्यानंतर एकनाथ शिंदे पत्रकारांशी बोलले त्यावेळी पत्रकारांनी त्यांना तुम्ही फडणवीसांच्या अपेक्षेनुसार मंत्रिमंडळात सामील होणार का असा अहवाल केला त्यावर अरे बाबा आम्ही संध्याकाळपर्यंत सगळे सांगू असे एकनाथ शिंदे म्हणाले.
पण तेवढ्यात शिंदेंचे संध्याकाळपर्यंत समजेल, पण मी मात्र देवेंद्रजींबरोबर शपथ घेणार आहे, असे अजितदादा उतावळ्या पणे म्हणाले. यातून अजितदादांची सत्तेची लालसा सगळ्या महाराष्ट्राला दिसली. पण एकनाथ शिंदे यांनी राजकीय टाइमिंग साधत अजित दादांना कोपरखळी मारली. अजितदादांना सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला शपथ घ्यायची सवय आहे. त्यामुळे ते उद्या संध्याकाळी शपथ घेतील, असे सांगत आहेत, असा टोला शिंदेंनी त्यांना हाणला.
शिंदेंचा हा टोलावर वर्मी बसताच, अजितदादांनी तात्काळ खुलासा केला. त्यादिवशी सकाळी शपथ घेतली त्यावेळी जास्त काळ सरकार चालू शकले नाही पण आता उद्या शपथ घेतल्यानंतर ते सरकार 5 वर्षे चालवू, असे अजितदादा म्हणाले. सरकार स्थापनेपूर्वी दोन उपमुख्यमंत्र्यांमधली शाब्दिक जुगलबंदी नियोजित मुख्यमंत्र्यांसमोरच रंगली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App