महिला दिन विशेष : देशात महिलांची संख्या प्रथमच पुरुषांपेक्षा जास्त; पाचव्या राष्ट्रीय कुटुंब आणि हेल्थ सर्व्हेनुसार स्पष्ट

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पहिल्यांदाच देशात महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त झाली आहे. पाचव्या राष्ट्रीय कुटुंब आणि हेल्थ सर्व्हेनुसार आता देशात प्रति १००० पुरुषांच्या तुलनेत १०२० महिला आहेत. For the first time, women outnumber men in the country; Explained according to the Fifth National Family and Health Survey

जगभरात आज महिला दिन साजरा केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर ही आकडेवारी भारतासाठी दिलासादायक मानली जात आहे. एक चांगली बाब ही आहे की, पाचव्या राष्ट्रीय कुटुंब आणि आरोग्य सर्वेक्षणानुसार २०१५ मध्ये हा आकडा ९९१ होता, तर स्वातंत्र्यानंतर १९५१ मध्ये हा आकडा९४६ होता.
विशेष म्हणजे शहरांच्या तुलनेत गावांमध्ये १००० पुरुषांमागे महिलांची संख्या जास्त आहे.



आपल्या देशात मुलींची भ्रूणहत्या होत होती. म्हणजेच त्यांच्यासाठी जगण्याची संधी मुलांच्या तुलनेत खूपच कमी होती, तेथे त्या आता पुढे जात आहेत. आता गावांमध्ये १००० पुरुषांमागे १०३७ आणि शहरांमध्ये ९८५ महिला आहेत. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे-4 नुसार गावांमध्ये प्रति १००० पुरुषांमागे १००९ महिला होत्या आणि शहरांमध्ये हा आकडा ९५६ होता.

लिंग गुणोत्तरात सुधारणेमुळेच संख्या वाढली

देशात पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या जास्त असण्याचे कारण हे आहे की, जन्माच्या वेळी लिंग गुणोत्तरातही सुधारणा झाली आहे. २०१५-१६ मध्ये जन्माच्या वेळी लिंग गुणोत्तर प्रति १००० मुलांमागे ९१९ मुली असा होता, जो आता ९२९ झाल आहे. याच कारणामुळे शहर आणि गाव दोन्हीही जागांवर प्रति हजार पुरुषांमागे महिलांची संख्या वाढली आहे. सर्वात चांगली बाब तर ही आहे की, सुधारणा शहरांच्या तुलनेत गावांमध्ये जास्त चांगली आहे. गावांमध्ये आता प्रति १००० पुरुषांमागे १०३७ महिला आहेत, तर शहरांत ९८५ महिला आहेत.

देशात महिला आघाडीवर

आता देशात महिला शिक्षण आणि कामाच्या बाबतीतही पुढे आहेत. विज्ञान आणि गणिताच्या पदवीधरांमध्ये महिलांचे प्रमाण ४३% आहे. ही आकडेवारी अमेरिका ३४ %, ब्रिटन ३८%, जर्मनी २७ % हून खूप जास्त आहे. देशात रजिस्टर्ड ५०हजार स्टार्टअप्समध्ये ४५ % महिला उद्यमी आहेत. महिलांचे स्टार्ट-अप ५ वर्षांच्या कालावधीत पुरुषांपेक्षा १०% जास्त महसूल गोळा करतात व तिप्पट महिलांना रोजगार देतात. हे आकडे महिलांचा काळ सुरू झाल्याचे संकेत आहेत.

For the first time, women outnumber men in the country; Explained according to the Fifth National Family and Health Survey

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात