विशेष प्रतिनिधी
भोपाळ – मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये पाऊस सुरूच असल्याने अनेक भागात पूराने हाहाकार माजविला आहे. उत्तर प्रदेशातही नऊ जिल्ह्यात पूर आला आहे. चंबळ नदीच्या रौद्र रुपाने अनेक गावांना धडकी भरली आहे.Flood situation in MP,UP and Rajshtan
मध्य प्रदेशमध्ये ग्वाल्हेर, चंबळ प्रदेशातील सुमारे १२२५ गावांना पुराचा फटका बसला असून अनेक पुलांची पडझड झाली आणि ठिकठिकाणी कालवेही फुटले आहेत. राजस्थानात देखील पाऊस सुरूच असून कोटा, बुंदी, धौलपूर येथे पूरजन्य स्थिती निर्माण झाली आहे.कोटात ८ इंच पाऊस पडल्याने गेल्या चार दशकांतील विक्रम मोडला आहे.
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर-चंबळ प्रदेशात शिवपुरी, श्योगपूर, दतिया, भिंड, मुरैना, ग्वाल्हेर येथे पुराने जनजीवन विस्कळित झाले आहे. शिवपुरीत सर्वाधिक ९० गावांना पावसाचा फटका बसला असून अन्नाअभावी ग्रामस्थांची वणवण सुरू झाली आहे.
ग्वाल्हेर-चंबळ विभागात सहा मोठे पूल वाहून गेले तर दोन डझनभरपेक्षा अधिक कालवे फुटले आहेत. शिवपुरी, श्योदपूर, भिंड आणि दतिया येते प्रत्येकी एक पूल वाहून गेले आहेत. याशिवाय ग्वाल्हेर, शिवपुरी, श्योधपूर महामार्गावर पाणी आले असून काही ठिकाणी रस्ते खचले आहेत. एकुणातच पूल आणि कालवे वाहून गेल्याने सुमारे ४०० कोटींचे नुकसान झाले आहे.
उत्तर प्रदेशात आग्रा, कानपूर, वाराणसी, जालौन, ललितपूर, मिर्झापूर, अमरोहा येथील पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आग्रा येथे चंबळ नदीची पातळी वाढली आहे. त्यामुळे लगतचे ५० गाव पाण्याखाली गेले आहेत. यमुनेची पातळी देखील वाढली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App