
वृत्तसंस्था
पाटणा : बिहारमध्ये नदीची पाणीपातळी वाढल्याने सुमारे पाच लाख लोकांना फटका बसला आहे. पूरग्रस्त जिल्ह्यांची संख्या १५ वरून १६ वर पोचली. तर उत्तर प्रदेशात चोवीस जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. गंगा, यमुनासह अनेक नद्यांची पातळी वाढलेलीच आहे. संगमनगरी प्रयागराज येथे गंगा आणि यमुना नदीची पाणी पातळी वाढलेली असल्याने नदीकाठचा भाग पाण्याखाली गेला आहे. वाराणसीतही गंगा नदीने रौद्र रूप धारण केले आहे. पाणी पातळी वाढल्यानंतर गंगा नदी वाराणसी शहरात वेगवेगळ्या मार्गाने प्रवेश करत आहे. वाराणसीत गंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. Flood condition worsen in UP and Bihar
बिहारमध्ये पाटण्याशिवाय वैशाली, भोजपूर, लखीसराय, मुजफ्फरपूर, दरभंगा, खगडिया, सहरसा, भागलपूर, सारण, बक्सर, बेगुसराय, कटिहार, मुंगेर, समस्तीपूर, पूर्णिया जिल्ह्यातील बहुतांश भाग पूरग्रस्त झाला आहे.
पूरग्रस्त भागात अत्यावश्य क वस्तू, साहित्याचा पुरवठा केला जात आहे. यासाठी २५८५ नौकांची मदत घेतली जात आहे. गरजेनुसार नौकेची संख्या वाढवण्याची सूचना देण्यात आली आहे. या भागात ६८ मदत छावण्या आणि ६२१ सामूहिक स्वयंपाकघर सुरू केले आहेत. या ठिकाणी काल ६ लाख २८ हजाराहून अधिक नागरिकांनी भोजन केल्याचे म्हटले आहे.
Flood condition worsen in UP and Bihar
महत्वाच्या बातम्या
- तिहेरी तलाक कायद्यानुसार गुन्हा, सौदी अरेबियातून पत्नीला फोनवरून दिला तलाक
- हिंदूत्वा ची तुलना तालीबान्यांशी, अभिनेत्री स्वरा भास्करवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
- तालीबान्यांच्या विजयाने भारतातही शाब्दिक फटाके, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या प्रवक्त्याने केला सलाम, हिंद मुस्लिमांना वाटतो गर्व
- तालीबानच्या कृत्याचे समर्थन करणाऱ्या खासदारासह दोघांवर देशद्रोहाचा गुन्हा, भारतीय स्वातंत्र्यलढ्याशी केली तुलना
- शिवसेना आमदार यामिनी जाधव यांना अपात्र ठरविण्याची आयकर विभागाची शिफारस, निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिली खोटी माहिती