वृत्तसंस्था
श्रीनगर : काश्मीर खोऱ्यातील पुलवामा व बडगाम जिल्ह्यांमध्ये उडालेल्या चकमकीत पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. त्यात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या एका स्वयंघोषित कमांडराचा समावेश आहे. Five terrorists killed in Kashmir; Including the commander of Jaish-e-Mohammed
जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख झाहीद वानी, असे कमांडरचे नावं आहे. काश्मीर खोऱ्यातील हत्या तसेच युवकांची दहशतवादी संघटनेत भरतीत त्याचा समावेश होता.
पुलवामाच्या नायरा भागात जैशचे ४ दहशतवादी मारले गेले, तर मध्य काश्मीरच्या बडगाम जिल्ह्याच्या चराच-ए-शरीफ भागात झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाचा एक दहशतवादी ठार झाला, अशी माहिती काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार आणि लष्कराच्या व्हिक्टर फोर्सचे कमांडिग अधिकारी मेजर जनरल प्रशांत श्रीवास्तव यांनी दिली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App