वृत्तसंस्था
न्यूयॉर्क : New York City अमेरिकेत भारतीयांचा प्रभाव वाटत असल्याचे बरेच निदर्शक समोर दिसतात. त्यापैकी अमेरिकेचे अध्यक्ष दरवर्षी वाईट हाऊस मध्ये भारतीय समुदायाला निमंत्रित करून दिवाळी साजरी करतात. पण त्यापलीकडे जाऊन संपूर्ण अमेरिकन समाजच दिवाळी सेलिब्रेशन मध्ये सहभागी होतो.New York City
आता अमेरिकेतील सगळ्यात मोठे शहर न्यूयॉर्कमध्ये 1 नोव्हेंबरला दिवाळीचे सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्या दिवशी न्यूयॉर्क मधल्या सर्व शाळा दिवाळीनिमित्त बंद राहतील. न्यूयॉर्कचे महापौर एरिक ॲडम्स यांनी हा निर्णय जाहीर केला.
न्यूयॉर्क मधल्या सर्व शाळांमध्ये तब्बल 1.1 मिलियन मुले शिकतात. त्यामुळे एकदम निर्णय घेऊन सगळ्या शाळा बंद करणे शक्य नसते. परंतु प्रशासनाने आधी नियोजन करून आता 1 नोव्हेंबर दिवाळीचा पाडवा या दिवशी दिवाळीची सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे, असे न्यूयॉर्कच्या महापौर कार्यालयातील डेप्युटी कमिशनर दिलीप चौहान यांनी स्पष्ट केले.
अमेरिकेत भारत यांचा प्रभाव वाढल्याचे हे निदर्शक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ज्यावेळी अमेरिकेत दौरा होतो. त्यावेळी मोठमोठ्या शहरांमध्ये भारतीय समुदाय जमीन त्यांचे स्वागत करतो. ती संख्या काही हजारांमध्ये असते. त्याचबरोबर न्यूयॉर्क सारख्या शहरांमध्ये तर लाखो भारतीय उद्योगधंदे व्यवसाय आणि नोकऱ्यांमध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. त्याचा परिणाम अमेरिकन प्रशासनाच्या धोरणावर ठळकपणे दिसून भारतीय सणवारांना तिथे सार्वजनिक महत्त्व आले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App