विशेष प्रतिनिधी
बलिया : अखिलेश यादव यांना पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयकडून संरक्षण आणि आर्थिक मदत मिळत असल्याचा संशय भारतीय जनता पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे संसदीय कामकाज राज्यमंत्री आनंद स्वरुप शुक्ला यांनी व्यक्त केला आहे.Financial support from ISI to Akhilesh Yadav, BJP ministers suspect
काही दिवसांपूर्वी अखिलेश यादव यांनी पाकिस्तानचे जनक मोहम्मद अली जिना यांच्याविषयी एक वक्तव्य केले होते. सरदार पटेल, राष्ट्रपिता महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि मोहम्मद अली जिना यांनी एकाच संस्थेतून शिक्षण घेतलं होतं आणि बॅरिस्टर बनले होते. तसंच त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मदत दिली आणि संघषार्तून कधीही काढता पाय घेतला नाही, असं अखिलेश यादव यांनी म्हटलं होतं.
पाकिस्तान आणि तालिबानला जे हवंय तशीच वक्तव्य अखिलेश यादव करत असल्याचा आरोप आनंद शुक्ला यांनी केला आहे. कदाचित अखिलेश यादव यांना पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयकडून संरक्षण आणि सल्ले मिळत असावेत. तसेच या संस्थांकडून त्यांना आर्थिक मदतही मिळत असावी, असेही त्यांनी म्हटले आहे.
स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्याशी जिनांची तुलना करणं ‘निंदणीय’ असल्याचे शुक्ला यांनी म्हटले आहे. याबद्दल अखिलेश यादव यांनी माफी मागावी अशी मागणीही शुक्लांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App