सार्वजनिक बँकींग क्षेत्रातील कामकाजाबाबत केलेल्या विधानांमुळे राहुल गांधींवर केला पलटवार
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Sitharaman केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली. मोदी सरकारच्या कार्यकाळात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या (पीएसबी) कामकाजाबाबत त्यांनी केलेल्या विधानांमुळे राहुल गांधींना कोंडीत पकडण्यात आले.Sitharaman
केंद्रीय मंत्री म्हणाल्या की, काँग्रेसच्या राजवटीत ते आपल्या व्यापारी मित्रांसाठी एटीएमप्रमाणे वागले होते. यापूर्वी, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X च्या माध्यमातून राहुल गांधी यांनी केंद्रावर पीएसबीला श्रीमंत आणि शक्तिशाली कॉर्पोरेशनसाठी खासगी वित्तपुरवठादार बनवल्याचा आरोप केला होता. या आरोपांनंतर निर्मला सीतारामन यांनी प्रत्युत्तर दिले.
सार्वजनिक बँकांची रचना प्रत्येक नागरिकाला कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी होती. मात्र मोदी सरकारने श्रीमंत आणि शक्तिशाली कॉर्पोरेशनसाठी या बँकांना खासगी फायनान्सर बनवले असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. या आरोपाला उत्तर देताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, “विरोधक नेते राहुल गांधी यांची पुन्हा एकदा बिनबुडाची विधाने सुरू झाली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात भारताच्या बँकिंग क्षेत्राचे, विशेषत: सार्वजनिक क्षेत्रातील बँकांने खूप मोठा बदल बघितला आहे. राहुल गांधींना भेटणाऱ्या लोकांनी त्यांना हे नाही सांगितले का की, काँग्रेसच्या कार्यकाळात अंदाधुंद कर्ज दिल्याने पीएसपीची कार्यपद्धती घसरली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App