वृत्तसंस्था
मुंबई : सुप्रसिद्ध कवी, लेखक, चित्रपट निर्माते आणि माजी राज्यसभा सदस्य प्रीतीश नंदी यांचे निधन झाले. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 73 वर्षांचे होते. अनुपम खेर यांनी एक्स या समाज मध्यमावर त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे. त्यांनी लिहिले की, प्रितिश नंदी एक निर्भय आणि धैर्यवान व्यक्ती होते. त्याच्याशी माझी घट्ट मैत्री होती आणि आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात तो एक भक्कम आधार होता.
प्रीतीश नंदी यांचा जन्म बिहारमधील भागलपूर येथे झाला. ते ‘द इलस्ट्रेटेड वीकली’चे संपादक म्हणून देखील कार्यरत होते. अनुपम खेर यांनी त्यांच्याविषयी लिहिले आहे की, माझा सर्वात प्रिय आणि जवळचा मित्र प्रितिश नंदी यांच्या निधनाने मला खूप धक्का बसला आहे. ते एक अद्भुत कवी, लेखक, चित्रपट निर्माते आणि एक धाडसी पत्रकार होते. मुंबईतील माझ्या सुरुवातीच्या दिवसांत तो माझी सपोर्ट सिस्टीम आणि माझ्या ताकदीचा सर्वात मोठा स्रोत होता. आमच्यात बरेच साम्य होते.
पुढे अनुपम खेर लिहतात, मला भेटलेल्या सर्वात निडर लोकांपैकी ते एक होते. त्यांचे व्यक्तिमत्व नेहमीच लार्जर दॅन लाईफ असे. त्याच्याकडून मला खूप काही शिकायला मिळाले. अलीकडे आमची फार काही भेट होत नव्हती. पण एक काळ असा होता जेव्हा आम्ही दोघे एकत्र राहत होतो. जेव्हा तो इलस्ट्रेटेड वीकली मासिकाच्या मुखपृष्ठावर दिसला तेव्हा त्याने मला आश्चर्यचकित केले होते. हे मी कधीच विसरणार नाही. ते खरे मित्र होते. प्रितिशसोबत घालवलेले क्षण माझ्या कायम लक्षात राहतील.
प्रीतीश नंदी हे कवी, लेखक, पत्रकार, चित्रपट निर्माता आणि संपादक म्हणून ओळखले जात होते. त्यांनी 1990 च्या दशकात दूरदर्शनवर द प्रितिश नंदी शो नावाचा टॉक शो आयोजित केला होता, ज्यामध्ये त्यांनी सेलिब्रिटींच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यांनी 2000 च्या दशकाच्या सुरुवातीला प्रितिश नंदी कम्युनिकेशन्स या बॅनरखाली अनेक चित्रपटांची निर्मिती केली. त्यांच्या कंपनीने अलीकडेच फोर मोअर शॉट्स प्लीज आणि मॉडर्न लव्ह मुंबई या काव्यसंग्रह मालिकेची निर्मिती केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App