विशेष प्रतिनिधी
जयपूर – राजस्थानात कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असल्याने निर्बंध शिथिल होत आहेत. परंतु धार्मिक स्थळे आणि चित्रपटगृहे सुरू करण्याबाबत अद्याप राजस्थान सरकारने निर्णय घेतलेला नाही. गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाने हाहा:कार माजवलेला असताना राजस्थानातील ३०० पैकी ४० टक्के चित्रपटगृहे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. Film industry suffering big loss due to corona
उत्तर भारतातील सर्वात मोठे वितरक राज बन्सल यांच्या मते, देशातील चित्रपटसृष्टीला कोरोनामुळे तब्बल ४५ ते ५० हजार कोटींचा फटका बसला आहे. राजस्थानला देखील जबर फटका बसला असून तातडीने चित्रपटगृहे सुरू झाली नाही तर स्थिती आणखी बिघडेल, असे पत्रात म्हटले आहे. नव्या गाइडलाइनुसार ५० टक्के क्षमतेनुसार चित्रपटगृहे सुरू करावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
राजस्थानातील विविध चित्रपटगृहात काम करणाऱ्यांवर अवलंबून असलेल्या दहा हजार कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. शेकडो कर्मचाऱ्यांचे रोजगार हिरावले गेले आहेत. राजस्थान फिल्म ॲड थिएटर्स असोसिएशनने मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना पत्र लिहून राज्यातील टॉकीज तातडीने सुरू करण्याची आणि काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी विशेष पॅकेज देण्याची मागणी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App