अमेरिकन नागरिकांना केलं जात होतं लक्ष्य
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : FBI अमेरिकन तपास संस्था एफबीआयने राजस्थानमधील सायबर फसवणुकीच्या मोठ्या नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे. एफबीआयकडून मिळालेल्या इनपुटच्या आधारे, राजस्थान इंटेलिजन्स आणि पोलिसांनी फसवणूक करणाऱ्यांचा माग काढला. हे सायबर ठग राजस्थानमध्ये बसून अमेरिकन नागरिकांना ऑनलाइन फसवणुकीचे शिकार बनवत होते.FBI
मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकन नागरिकांसोबत कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीचे प्रकरण समोर आल्यानंतर अमेरिकन एजन्सी एफबीआयने त्याची चौकशी सुरू केली. भारतातील राजस्थानमध्ये बसून गुंडांनी हा गुन्हा केल्याचे तपासात समोर आले आहे. यानंतर एफबीआयने भारत सरकारच्या माध्यमातून राजस्थान इंटेलिजन्स, एसओजी आणि जयपूर आयुक्तालय पोलिसांशी संपर्क साधला.
एफबीआयने त्यांना सर्व माहिती पुरवली, त्यानंतर भारतीय एजन्सी आणि पोलिसांनी तत्काळ कारवाई करत हे ठग शोधून काढले. एवढेच नाही तर राजधानी जयपूरमध्ये अनेक फसवे कॉल सेंटर्सही पकडले गेले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App