उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये तीन दिवसांपूर्वी हिंदू नववर्षानिमित्त आरएसएसच्या पथसंचलनाचे स्वागत करण्यासाठी मुस्लिम डॉक्टरही सरसावले होते. त्यांनी फुलांचा वर्षाव केल्यावर परिसरातील काही जिहादी विचारसरणीच्या लोकांनी डॉक्टरच्या विरोधात फतवा काढला आणि त्याच्यावर एक लाख रुपयांचे इनामही ठेवले. यानंतर पीडित डॉक्टरने पोलिसांत तक्रार केली आहे.Fatwa against Muslim doctor in Uttar Pradesh, For raining flowers on the Rashtriya Swayamsevak Sangh parade
वृत्तसंस्था
लखनऊ : उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये तीन दिवसांपूर्वी हिंदू नववर्षानिमित्त आरएसएसच्या पथसंचलनाचे स्वागत करण्यासाठी मुस्लिम डॉक्टरही सरसावले होते. त्यांनी फुलांचा वर्षाव केल्यावर परिसरातील काही जिहादी विचारसरणीच्या लोकांनी डॉक्टरच्या विरोधात फतवा काढला आणि त्याच्यावर एक लाख रुपयांचे इनामही ठेवले. यानंतर पीडित डॉक्टरने पोलिसांत तक्रार केली आहे.
पोलिसांनी आता गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. ही घटना २ एप्रिलची असल्याचे सांगण्यात येत आहे. संघातर्फे सकाळी ठिकठिकाणी पथसंचलन करण्यात आले. बीएमयूएसच्या वतीने मुरादाबादच्या ठाणे मनाथेर भागातील महमूदपूर माफी येथील रहिवासी डॉ. मोहम्मद निजाम भारती आणि त्यांच्या कुटुंबीयांनी जवळून जात असलेल्या पथसंचलनावर पुष्पवृष्टी केली होती.
त्यामुळे परिसरातील मुस्लिम समाजाशी संबंधित काही लोक संतप्त झाले. त्यांनी डॉक्टरांच्या विरोधात फतवा काढल्याने त्यांना मशिदींमध्ये प्रवेश दिला जात नाही आणि मुस्लिम समाजातून त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यात आला आहे. यासाठी आरोपींनी परिसरात फतव्याची पत्रिकाही वाटली. याचे सीसीटीव्ही चित्रणही आढळले आहे.
योगी सरकारकडे सुरक्षेची विनंती
पीडित डॉक्टरचे कुटुंब गेल्या अनेक दिवसांपासून दहशतीत जगत आहे. त्यांच्या तक्रारीनंतर मुख्य आरोपी हाफिज इम्रान वारसीला अटक करण्यात आली. डॉ. भारतींची हत्या करणाऱ्याला एक लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणाही आरोपींनी केली होती. जीव आणि मालमत्तेच्या सुरक्षेसाठी योगी सरकारला डॉ.मोहम्मद भारती यांनी विनंती केली. आरोपी हे जिहादी मानसिकतेचे लोक आहेत, त्यामुळे त्यांना कुटुंबाच्या जिवाची भीती वाटत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App