20 हून अधिक जखमी; अनेक जखमींची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: दिल्ली-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला. या घटनेत 20 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. ज्यावर सध्या अंबाला रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अंबाला येथे हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, मिनी बसची ट्रकला धडक बसल्याने हा अपघात झाला. महामार्गावर ट्रकने अचानक ब्रेक लावल्याने मागून येणाऱ्या मिनी बसने धडक दिल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.Fatal accident Mini bus going to Vaishnodevi collides with truck, seven from same family killed
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर येथील भाविक माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी मिनी बसने जात होते. अपघातातून थोडक्यात बचावलेल्या इतर लोकांनी सांगितले की त्यांच्या मिनी बसच्या पुढे धावणाऱ्या ट्रकने अचानक ब्रेक लावला. त्यामुळे मिनी बस ट्रकला धडकली. या घटनेत मृत्युमुखी पडलेले सातही जण एकाच कुटुंबातील होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत जखमी झालेल्या तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर चार जणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
अंबालाच्या पडाव पोलीस ठाण्याचे एसएचओ दिलीप यांनी सांगितले की, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार या अपघातात आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. ज्यांची प्रकृती गंभीर आहे त्यांना जवळच्या मोठ्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेत जखमी झालेल्यांपैकी काहींवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत, तर काही जखमींची प्रकृती लक्षात घेऊन त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App