जुन्याच मागण्या, जुनीच मोडस ऑपरेंडी त्यामुळे आंदोलनकर्त्यांनीच आपल्याच आंदोलनातली हवाच काढली!!, अशी खरंच अवस्था दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाची आणि मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षण आंदोलनाची झाली आहे. Farmers agitation and manoj jarange patil agitation getting exposed by their intentions itself!!
शेतकरी आंदोलन आणि मराठा आंदोलन यातल्या मागण्या जुन्याच आहेत. त्यातल्या बहुतेक मागण्या मोदी सरकारने आणि शिंदे – फडणवीस सरकारने मान्य देखील केल्या आहेत. किमान आधारभूत किमतीचा कायदा व्हावा, यासाठी शेतकरी आंदोलन करून दिल्लीची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण ज्यावेळी लोकसभेचे शेवटचे अधिवेशन संपले आहे, 17 वी लोकसभा आता भंग होणार आहे, ते “टायमिंग” साधून आंदोलन करण्यात शेतकऱ्यांनी काय मतलब साध्य केला आहे??, हा खरा प्रश्नच आहे.
लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर नवे सरकार स्थिर झाल्यानंतर सरकारचा हेतू लक्षात घेऊन व्यवस्थित रणनीती आखून शेतकऱ्यांनी आंदोलन केले असते, तर ते आंदोलन वेगळे आणि प्रामाणिक ठरले असते. पण आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यामुळे मोदी सरकारच्या नव्हे, तर शेतकऱ्यांच्याच राजकीय हेतूंबद्दल संपूर्ण समाज मनात दाट शंका निर्माण झाली आहे.
आधीच्या शेतकरी आंदोलनाच्या वेळी प्रचंड दबाव आणून आणि आंदोलनात फुटीरतावादी शक्ती घुसवून मोदी सरकारला आपण वाकविले हा शेतकरी आंदोलकांना आणि त्यांच्या म्होरक्यांना आनंद जरूर घेता आला. कारण मोदी सरकारला तीन वादग्रस्त कृषी कायदे मागे घेणे भाग पडले. पण मोदी सरकारने संपूर्ण बहुमतानीशी संसदेने मंजूर केलेले कायदे मागे घेतले, यातून मोदी सरकारचे प्रामाणिक हेतू संपूर्ण देशाला दिसले. मोदी सरकारच्या प्रामाणिक हेतूंमध्ये खोट काढण्याची शेतकऱ्यांना आता मूभाच उरलेली नाही. त्यामुळे त्यावेळी तात्पुरते मागे घेतलेले पाऊल मोदी सरकार साठी राजकीय यश देणारे ठरले.
https://twitter.com/AshokShrivasta6/status/1757633420367167814?s=20
आता जेव्हा शेतकरी दिल्लीची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यावेळी मोदी सरकारच्या हेतूंविषयी भारतातल्या समाजमनाला शंका नाही. उलट शेतकऱ्यांच्या हेतूंविषयी दाट शंका निर्माण झाली आहे. हा या आंदोलनातला सगळ्यात मोठा अयब म्हणजे दोष आहे. पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेश इथले शेतकरी दिल्लीची कोंडी करू पाहत आहेत. या प्रदेशात लोकसभेचे 40 मतदारसंघ येतात. त्यावर जाट मतदारांचा प्रभाव मानला जातो. आंदोलनातले बहुसंख्य शेतकरी देखील जाट आहेत. त्यामुळे आंदोलनाचा फटका भाजपला बसेल, असे बोलले जात आहे. पण चौधरी चरण सिंह यांना भारतरत्न जाहीर करून, त्यांचे नातू जयंत चौधरी यांना आपलेसे करून मोदी सरकारने आंदोलन शेतकरी आंदोलनातून होणारे संभाव्य राजकीय नुकसान “मिनीमाईज” करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. त्याचेच परिणाम लोकसभा निवडणुकीच्या निकालांमधून दिसणार आहेत.
मराठा आंदोलनाचेही तेच
जे शेतकरी आंदोलनाचे झाले आहे, तेच आता मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आंदोलनाचे होत चालले आहे. मनोज जरांगे पाटलांनी वारंवार उपोषण करून आणि महाराष्ट्रभर दौरे काढून एक वातावरण निर्मिती जरूर केली, पण शिंदे – फडणवीस सरकारची मराठा आरक्षणाची प्रामाणिक भूमिका त्यानिमित्ताने जनतेसमोर वारंवार येत राहिली. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यवस्थित राजकीय व्यूहरचना करून मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला “अचूक राजकीय प्रतिसाद” दिला. मराठा आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टात “क्युरेटीव्ह पिटिशन” दाखल केली. जरांगे पाटलांनी जे म्हणून लेखी मागितले, ते सगळे लेखी दिले. त्यामुळे शिंदे – फडणवीस सरकारचा प्रामाणिक हेतू व्यवस्थित अधोरेखित झाला. तरी देखील आज जरांगे पाटील पुन्हा आंदोलन करत आहेत. त्यांना मराठी माध्यमे प्रसिद्धी देखील भरपूर देत आहेत. पण आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जरांगे पाटलांच्या आंदोलनाविषयी दाट शंका निर्माण झाली आहे.
मराठा आरक्षणापलीकडे जाऊन त्यांना मोदी सरकार आणि शिंदे – फडणवीस सरकारला विशिष्ट राजकीय हेतूनेच विरोध करायचा आहे. मराठा आरक्षणापेक्षा हा विशिष्ट राजकीय हेतूच त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे, हे समोर येत चालले आहे आणि त्यामुळे मतदारांचे ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणावर होत चालले आहे. जरांगे पाटलांच्या बाजूने म्हणजेच शिंदे – फडणवीस सरकारच्या विरोधात जेवढे मतांचे ध्रुवीकरण होईल, त्याच्या दुप्पट – तिप्पट ध्रुवीकरण शिंदे – फडणवीस सरकारच्या बाजूने होण्याची शक्यता आहे. हा मुद्दा इथे अधोरेखित केला पाहिजे.
दोन्ही आंदोलनकर्ते “एक्स्पोज”
कुठल्याही आंदोलनाचा हेतू त्या विशिष्ट प्रश्नांपुरता मर्यादित ठेवला आणि व्यवस्थित रणनीती आखून आंदोलनाचा विस्तार वाढवत नेला, तर आंदोलन यशस्वी देखील होते. पण जर मूळात आंदोलनाचा हेतूच छुपा राजकीय अजेंडा चालविण्याचा असेल आणि तो केवळ शेतकरी अथवा एका समाजाच्या हिताच्या बुरख्याआड दडलेला असेल, तर ते आंदोलन यशस्वी होण्याची शक्यता असते. पण त्या निमित्ताने काळाच्या ओघात आंदोलनकर्ते आणि त्यांचे हेतूच “एक्सपोज” होण्याचा धोका मात्र 100 % संभवतो. शेतकरी आंदोलन आणि मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन यांच्या बाबतीत नेमके हेच सध्या घडत आहे. दोन्ही आंदोलनकर्ते “एक्सपोज” होत आहेत!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App