प्रतिनिधी
बेंगलोर : कर्नाटकात शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची रक्कम वाढवल्यानंतर त्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ झाली आहे. वाढीव नुकसान भरपाई मिळवण्यासाठी शेतकरी आत्महत्या करतात, असे बेलगाम उदगार कर्नाटक मधले काँग्रेसचे वस्त्रोद्योग आणि कृषी व्यापार मंत्री शिवानंद पाटील यांनी काढले आहेत. त्यामुळे कर्नाटकाबरोबरच महाराष्ट्रातील त्यांच्याविषयी प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.Farmer dying by suicide to claim compensation say Karnataka minister
पण शिवानंद पाटील यांनी शेतकऱ्यांविषयी असे बेलगाम उद्गार काढण्याची पहिलीच वेळ नाही. 2015 मध्ये देखील कर्नाटकात शेतकऱ्यांची नुकसान भरपाई 2 लाखांवरून 5 लाखांपर्यंत वाढविल्यानंतर त्यांनी अशाच आशयाचे उद्गार काढले होते. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांविषयी ते नेहमीच संवेदनशील बोलत राहतात. यावेळी देखील त्यांनी शेतकऱ्यांवरच आत्महत्येचा ठपका ठेवला आहे.
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री काँग्रेसच्या नेते डी. के. शिवकुमार भारतातले सर्वात श्रीमंत आमदार 1413 कोटींची संपत्ती!!
कर्नाटकात सरकारने वारंवार शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची रक्कम वाढवल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये भरच पडली. वाढीव नुकसान भरपाई मिळवण्यासाठी शेतकरी आत्महत्या करत असतात, असे उद्गार शिवानंद पाटलांनी पुन्हा काढले.
मात्र त्यावर वाद निर्माण झाल्यानंतर ते ताबडतोब खुलासा करायलाही बाहेर आले. शेतकऱ्यांवर माझा ठपका नाही. पण माध्यमे नेहमीच पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआर वरून शेतकरी आत्महत्येच्या बातम्या देतात. त्यांनी फॉरेन्सिक लॅबचा अहवाल येईपर्यंत थांबायला हवे. कारण त्यातूनच शेतकरी नेमके कशामुळे निधन पावले हे कळेल. बहुतांश शेतकरी हृदयविकार किंवा अन्य वैद्यकीय कारणांनी जातात, असा अजब खुलासा शिवानंद पाटलांनी केला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App