जाणून घ्या, काय सांगितलं पक्षात येण्याचे कारण?
विशेष प्रतिनिधी
पाटणा: बिहारमधील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यूट्यूबर मनीष कश्यप पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मनीष कश्यप यांनी आज (25 एप्रिल) भाजपमध्ये प्रवेश केला. मनीष कश्यप यांनी दिल्लीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्याच्यासोबत त्याची आईही दिल्लीला गेली होती.Famous YouTuber from Bihar Manish Kashyap joins BJP
मनीष कश्यप पश्चिम चंपारण मतदारसंघातून अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत होते. त्यामुळे भाजपचे विद्यमान खासदार संजय जयस्वाल यांच्या अडचणी वाढल्या होत्या. आता संजय जयस्वाल यांच्यासाठी दिलासादायक बातमी आहे. YouTuber म्हणून प्रवास सुरू करून मनीष कश्यप राजकारणात आपले पाय कसे प्रस्थापित करत आहेत हे सर्वांनाच पाहायचे आहे.
मनीष कश्यपच्या भाजपमध्ये प्रवेश करण्यावर भाजप खासदार मनोज तिवारी म्हणाले की, मनीष कश्यप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांची आई याप्रसंगी हजर होत्या.. मनीष कश्यप मोदींच्या समर्थनार्थ नेहमी बोलले आहे. भाजपने त्यांना नेहमीच पाठिंबा दिला आहे.”
यूट्यूबर मनीष कश्यप हा पश्चिम चंपारणच्या मझौलिया ब्लॉकमधील महानवा डुमरी गावचे रहिवासी आहेत. ते भूमिहार जातीचे आहेत. मनीष कश्यप हे सुरुवातीच्या काळात हिंदू संघटनेशी संबंधित होते. नंतर ते विद्यार्थी संघटनेत सामील झाले आणि विद्यार्थी संघटनेत असतानाच त्यांच्याविरुद्ध अनेक प्रकरणांत एफआयआर नोंदवण्यात आला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App