वृत्तसंस्था
लंडन : भारताचे माजी सॉलिसिटर जनरल आणि ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी वयाच्या 68व्या वर्षी लंडनमध्ये ब्रिटीश महिला ट्रिना यांच्याशी विवाह केला. उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या पत्नी नीता अंबानी यांनीही या हायप्रोफाईल लग्नाला हजेरी लावली.Famous lawyer Harish Salve married for the third time; Married in London to Trina of British descent
आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदीही आले होते. त्यांच्याशिवाय सुनील मित्तल, एलएन मित्तल, एसपी लोहिया, गोपी हिंदुजा यांच्यासह अनेक मोठे उद्योगपतीही रिसेप्शनमध्ये उपस्थित होते.
‘जे सर्वोत्तम असेल, तेच केले जाईल’, समितीचे सदस्य ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांचे वन नेशन-वन इलेक्शनवर मत
कोण आहेत हरीश साळवे?
हरीश साळवे हे देशातील सर्वात महागड्या वकिलांपैकी एक आहेत. त्यांना 2015 मध्ये पद्मभूषण पुरस्कार मिळाला होता. ते 1999 ते 2002 पर्यंत देशाचे सॉलिसिटर जनरल होते. साळवे हे अँटी डंपिंग प्रकरणात बाजू मांडण्यासाठी प्रसिद्ध झाले. 2015 मध्ये, हरीश साळवे यांनी सलमान खानची 2002 मधील हिट-अँड-रन केस लढली होती.
पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या कुलभूषण जाधव यांचा खटला आंतरराष्ट्रीय न्यायालयात लढण्यासाठी एक रुपया फी त्यांनी आकारली होती. साळवे यांनी नागपूर विद्यापीठातून एलएलबीचे शिक्षण घेतले. केंद्र सरकारने त्यांचा वन नेशन वन इलेक्शनच्या आठ सदस्यीय समितीमध्ये समावेश केला आहे.
2020 मध्ये साळवे यांनी कॅरोलिन यांच्याशी दुसरे लग्न केले
हरीश साळवे यांनी 2020 मध्ये कॅरोलिन ब्रॉसार्डशी दुसरे लग्न केले. 28 ऑक्टोबर रोजी लंडनमधील चर्चमध्ये त्यांचे लग्न झाले. ब्रॉसार्ड या ब्रिटनमधील कलाकार आहेत. हे त्यांचे दुसरे लग्नदेखील होते. ब्रॉसार्ड यांना त्यांच्या पहिल्या पतीकडून एक मुलगी आहे.
मीनाक्षींशी पहिले लग्न 1982 मध्ये, 38 वर्षे टिकले
हरीश साळवे यांनी 1982 मध्ये मीनाक्षींशी पहिले लग्न केले. 38 वर्षांनंतर 2020 मध्ये दोघे वेगळे झाले. त्यांना पहिल्या पत्नीपासून साक्षी आणि सानिया या दोन मुली आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more