विशेष प्रतिनिधी
दिल्ली : असं म्हणतात की स्वप्न कधीच जुनी होत नाहीत. जसे दिवस जातात तशी ती अधिक बळकट होत जातात. फक्त स्वप्नांमध्ये बळ भरण्याचे काम आपण आपल्या प्रयत्नांनी केलं पाहिजे. नायका या कंपनीच्या फाउंडर फाल्गुनी नायर ह्या याचे उत्तम उदाहरण आहेत. वयाच्या 50 व्या वर्षी त्यांनी नायका ही कंपनी सुरू केली. त्या आयआयएम अहमदाबाद पासआउट आहेत. याआधी त्या कोटक महिंद्रा बँक मध्ये चीफ मॅनेजिंग डिरेक्टर म्हणून काम करायच्या.
Falguni Nair; India’s richest self-made business woman, owner of Nayaka Company! The business was started at the age of 50
त्यांचे वडील एक गुजराती बिझनेसमन होते. त्यामुळे पुढे जाऊन बिझनेस करण्याचे त्यांनी आधीपासूनच ठरले होते. पण काही कारणाने ते होऊ शकले नाही. अखेर त्यांनी वयाच्या 50 व्या वर्षी स्वतःचा बिझनेस सुरु करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्यांच्या इन्व्हेस्टर्सना देखील त्यांच्या व्हिजन बद्दल गँरेंटी न्हवती. एक महिला, ती ही 50 वर्षाची अश्या संकुचित मानसिकतेचा त्यांना सामना करावा लागला होता. पण इच्छा शक्ती प्रबळ असते तेव्हा ह्या सर्व गोष्टी नगण्य असतात.
अमेरिकन पॉपस्टार निक जोन्सच्या सोलापुरी चादरीपासून शिवलेल्या शर्टाची चर्चा, सोशल मीडियावर छायाचित्र व्हायरल
आजकालच्या डिजीटल युगामध्ये ऑनलाईन शॉपिंगचे सर्वांनाच आकर्षण असते. त्यांच्या या करिअरमध्ये सर्वात मोठे योगदान कोणाचे असेल? तर ऑनलाईन शॉपिंगच्या अॅट्रॅक्शनचे. त्यांना ऑनलाईन शॉपिंग करण्याचे जबरदस्त अॅट्रॅक्शन होते. तर दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना स्वत:ला मेकअप करायला खूप आवडायचा. या दोन गोष्टी त्यांना त्यांचा बिझनेस सुरु करण्यासाठी प्रेरणा देत होत्या. असे त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे.
जेव्हा फॉरेन ब्रँडच्या प्रोडक्ट्सना भारतामध्ये इम्पोर्ट करण्या संदर्भात काही रिझर्वेशनच्या अडचणी आल्या, तेव्हा त्यांनी स्वत:चे मॅन्युफॅक्चरिंग चालू करण्याचा निर्णय घेतला. नायका नेल पेंट पासून आज सर्व प्रकारचे ब्यूटी प्रोडक्ट त्यांनी लॉन्च केले आहेत.
ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्स यांच्या अनुमानानुसार फाल्गुनी नायर ह्या भारतातील सर्वात श्रीमंत महिला अब्जाधीश बनल्या आहेत, ज्या सेल्फ मेड आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App