प्रतिनिधी
मुंबई : केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीर भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यावर आता सायबर गुन्हेगारांची नजर आहे. अर्ज नोंदणी करण्याच्या नावाखाली सायबर गुन्हेगार अनेकांच्या मोबाईलवर संदेश पाठवून मोठा सापळा रचत आहेत. त्यामुळे युवकांना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. पोलीसांनी तसा इशारा दिला आहे. Fake websites created by cyber criminals
अग्निवीर भरतीमध्ये सामील होण्यासाठी, उमेदवारांना ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करावी लागते. परंतु अनेकांना अग्निवीर भरती प्रक्रियेसंदर्भात योग्य माहिती नाही. त्यामुळे अनेक युवक संभ्रमात आहेत. युवकांना जाळ्यात ओढण्यासाठी सायबर गुन्हेगारांच्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. सायबर गुन्हेगारांनी अनेक संकेतस्थळावर बनावट माहिती तयार करुन अग्निवीर भरतीसाठी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.
अग्निवीर भरतीसाठी सज्ज असलेल्या उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरुनच माहिती मिळवावी. कोणत्याही संदेशातील लिंकवर क्लिक करु नये : सुकेशिनी लोखंडे, एपीआय, सायबर क्राइम
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App